पंतप्रधान मोदींनी घेतला मोठा निर्णय!

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी नेहमीप्रमाणे आपल्या मनातील गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवली पण या गोष्टीमुळे मात्र सोशल मीडिया वरती फार मोठं वादळ निर्माण झालेलं आहे. प्रत्येक जण काल सायंकाळपासून या ट्वीट बद्दलच विचार करत आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात…

आज-काल सोशल मीडिया किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्यापैकी प्रत्येकालाच माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत आहेत, परंतु काल त्यांनी ट्विट करत फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला रामराम ठोकण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे.

त्यांच्या या ट्वीट नंतर सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणात एक वादळ निर्माण झालेलं आहे. जो तो फक्त नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विट बद्दल बोलताना दिसून येईल. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की नरेंद्र मोदी यांनी असा विचार करण्यामागे काय कारण आहे. त्यांच्या काही चाहत्यांनी तर हे देखील स्पष्ट केले आहे की जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील हे प्लॅटफॉर्म सोडले तर त्यांचे चाहते देखील या प्लॅटफॉर्मचा कधीही वापर करणार नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर अत्यंत प्रभावी पद्धतीने करत असल्याचे आपल्याला दिसून येईल. त्यांनी अनेक आनंदाच्या प्रसंगी तसेच, दुःखाच्या प्रसंगी ट्विटरच्या माध्यमातून जनतेच्या सुखदुःख मध्ये सहभाग नोंदवला आहे. नरेंद्र मोदी फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम वरती नेहमीच काहीतरी पोस्ट करतच असतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर वरती 53.3 मिलियन एवढे फॉलॉवर आहेत तर इंस्टाग्राम वरती 35.2 मिलियन एवढे फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आधी कधीच असा विचार बोलून देखील दाखवला नव्हता.

मागच्या काही महिन्यांमधील घटनांमुळे कदाचित, नरेंद्र मोदी असा विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे. कारण दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीमुळे खूपच जास्त प्रमाणात व्यथित झाल्याचे सांगण्यात येतं. त्यासोबतच जागतिक पातळीवरील मीडियाने देखील नेहमीच नरेंद्र मोदी यांना लक्ष करत चुकीच्या बातम्या देखील पसरवलेल्या आहेत.

आणि या सर्व गोष्टींचा मनस्ताप कोणालाही होऊ शकतो, एक शक्यता अशी देखील वर्तवण्यात येते की नरेंद्र मोदी भारतात तयार झालेलं कुठलंतरी नवीन एप्लीकेशन वापरतील आणि त्याला प्रसिद्धी मिळवून देतील परंतु खरं कारण काय आहे हे काळच ठरवेल. त्यामुळे याप्रकरणातील नवीन माहिती घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment