पंतप्रधान मोदींजींचे हे विशेष विमान आहे अभेद्य, त्याची किंमत आणि एका तासाच्या प्रवासाचा खर्च ऐकून थक्क व्हाल!
“हवेतील उडता अभेद्य किल्ला” असे वर्णन केले जाणारे सुपर व्हीआयपी बोईंग ७७७ विमान भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई दामोदरदास मोदी यांच्या परदेशवाऱ्यांसाठी नुकतेच खरेदी केले आहे. सर्वप्रकारच्या अत्यंत आधुनिक सुखसोयी आणि सुरक्षा प्रणालीयुक्त असणाऱ्या अशा विमानांसाठी भारताने तब्बल ८४०० कोटी रुपये मोजले आहेत.
या सुपर व्हीआयपी विमानाचा ताशी वेग ९०० कि.मी. असणार आहे. हे विमान इतके सामर्थ्यशाली आहे की, लष्करी क्षे’प’णा’स्त्रही विमानाला आणि आतील प्रवाशाला काडीचीही हा’नी पोहचवू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींसाठी अमेरिकेत डिझाइन केलेले हे खास बोईंग ७७७ विमान नुकतेच दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी वापरल्या जाणाऱ्या एअरफोर्स वन यासारख्याच सर्व क्षमतांनी सुसज्ज अशा या विमानात अनेक वैशिष्ट्ये आहेत.
या बोईंग ७७७ विमानामध्ये स्वतःची क्षे’प’णा’स्त्र संरक्षण यंत्रणा आहे. या विमानात मिरर बॉल सिस्टम देखील आहे. हे आधुनिक स्वयंचालित सिग्नल क्षे’प’णा’स्त्रांना गोंधळात टाकू शकते व टार्गेट पासून भ’ट’क’वू शकते. सबब या विमानावर क्षे’प’णा’स्त्र ह’ल्ल्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
या विमानाच्या पुढील भागामध्ये जॅ’म’र आहे. ज्यामध्ये कोणत्याही शक्तिशाली रडार सिग्नलला जाम करण्याची शक्ती आहे. हे विमान सेल्फ प्रोटेक्शन स्विट्स (स्वसुरक्षाकक्ष) आणि अत्याधुनिक संदेश दळणवळण प्रणालींनी सुसज्ज आहे. इ’म’र्ज’न्सी मध्ये हवेतल्या हवेतच ईंधन भरण्याचीही सुविधा त्यात आहे. तेव्हढ्याकरता खाली उतरायची गरज नाही. एकदा टॅंक फुल्ल केल्यावर हे विमान ४५,१०० फूट उंचीवरून सर्वोत्तम वेगाने सलग ६८०० कि.मी. प्रवास, म्हणजे भारतातून थेट अमेरिकेपर्यंत लांब उड्डाण करू शकते.
नरेंद्रभाई मोदींच्या या खास विमानाच्या एका तासाच्या प्रवासकरिता तब्बल 1,81,000 डॉलर म्हणजेच १ कोटी ३० लाख रुपये एव्हढा अंदाजे खर्च होतो.
भारताने अमेरिकेबरोबर फेब्रुवारीमध्ये जवळपास ८४०० कोटी रुपये खर्च करून अशी दोन विमाने खरेदी केली होती. लवकरच अमेरिकेतून त्या दुसऱ्या विमानाचे आगमनही भारतात होऊ शकते. हे सुपर व्हीआयपी विमान एअर इंडिया नव्हे तर भारतीय वायुसेनेद्वारे चालवले जाईल. भारताचे मा. राष्ट्रपती व मा. उपराष्ट्रपती हे देखील संधी मिळाल्यास यातून प्रवास करू शकतात.
विशेष म्हणजे या विमानातील विमानचालक आणि सर्व कर्मचारी दल हे अस्सल देशी खादी युनिफॉर्म मधेच असतील. पुरुषांसाठी बं’द गळ्याचा जोधपुरी व त्यावर जॅकेट आणि महिला वर्गांसाठी रेशमी साडी अशी वस्त्रं नियमावली असेल.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.