“तारक मेहता…” मालिकेतील पोपटलालचे झाले लग्न, पोपटलालची प्रेमकहाणी ऐकून थक्क व्हाल!

“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा तर तुमचा- आमचा सर्वांचाच आवडता शो आहे. या शो मधील नवनवीन ट्वीट आणि सर्वा कलाकारांचे अप्रतिम अभिनय यामुळे दिवसेंदिवस या शो चा टीआरपी गगनाला भिङताना दिसत आहे. शो मधील सर्व कलाकार उत्कृष्ट आहेत.

मात्र पोपटलाल यांची कमालच काही न्यारी आहे. पोपटलाल हे शो सुरू झाल्यापासून तब्बल 12 वर्षे आपल्या विवाहासाठी एक सुंदर- सुशील अशी मुलगी पाहत आहेत. परंतु त्यांचा लग्नाचा योग मात्र जुळून आला नाही.

सध्या “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मध्ये पोपटलालचे लग्न झालेले आहे, असे दाखविण्यात येत आहे. त्याचे झाले असे की, गोकुळधाम सोसायटीचे सेक्रेटरी मास्टर भिडे यांनी पत्रकार पोपटलालच्या बाल्कनीत नववधूच्या वेशात एका मूलीला पाहिले. त्यामुळे ते स्वतः खूप आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी संपूर्ण सोसायटीला पोपटलालचे लग्न झाले, असे उत्सुकतेने सांगितले.

आतापर्यंत अनेकदा “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मध्ये पत्रकार पोपटलालच्या लग्नाविषयीचे बरेच ट्विस्ट दाखवले गेले. एकदा तर भरमंङपात पोपटलालचे लग्न होता- होता राहिले होते. त्यानंतर तर एकदा स्वतः पोपटलालनेच लग्नाला नकार दिला होता. अशाप्रकारे आपल्या आयुष्याच्या जीवनसाथीच्या शोधात असलेल्या बिचाऱ्या पोपटलालचे दोनाचे चार हात कधी होणार, याच विचारात सर्वजण होते.

“तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मध्ये पोपटलालच्या बाल्कनीत नववधू बघितल्यावर आता तर पोपटलालचे खरेच लग्न झाले आहे, असे सर्वजण समजत आहेत. एवढंच नाही तर मिसेस पोपटलाल यांच्या स्वागताच्या तयारीची धामधूम देखील गोकुळधाम सोसायटीत सुरू झाली आहे.

त्यामुळे सोसायटीतील सर्वजण आपल्या नवीन मिसेस पोपटलाल वहिनींचे स्वागत कसे आणि कोणत्या पद्धतीने करायचे, याबद्दल आपले वैयक्तिक मत दर्शवत आहे. पण पोपटलाल भावजींनी आपल्याला लग्नाबद्दल का बरं सांगितले नाही, हा विचार देखील सगळे करत आहेत.

“तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मध्ये आता आणखी नवीन कोणतं ट्विस्ट येणार, हे पाहण्यासाठी चाहतावर्ग खूपच उत्सुकतेत आहे. मात्र पत्रकार पोपटलालने असे गुपचूप लग्न का बरं केलं, नवीन वर्षाच्या सुरूवातीला आपल्या लग्नाची गोड बातमी त्यांना सर्वांना द्यायची आहे का? याव्यतिरिक्त आणखी काही सत्य आपल्या समोर येणार का? असे अनेक प्रश्न सध्या तुमच्या- आमच्या मनात सुरू आहेत. मात्र या सर्व प्रश्नांचे निरसण हे आपल्याला “तारक मेहता का उल्टा” या शो च्या पुढील एपिसोड मधूनच समजेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment