“तारक मेहता…” मधील पोपटलालने या कारणामुळे सोडली पत्रकारिता, कारण आहे…
“तारक मेहता का उल्टा चश्मा” ही टेलिव्हिजनवरील सर्वांची फेवरेट मालिका आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आनंदाने ही मालिका पाहतात. इतकंच नव्हे तर ही मालिका पाहिल्याशिवाय काही लोकांचा तर दिवस देखील जात नाही. त्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांचा भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकारासोबत चाहत्यांचे एक खास नाते निर्माण झाले आहे.
ह्या मालिकेतील पत्रकार पोपटलाल ही व्यक्तिरेखा अजूनही अविवाहित आहे. आपले लग्न केव्हा बरं होणार, या विचाराने ते सतत चिंतेत असतात. लग्नासाठी सतराशे साठ प्रयत्न करणारा पोपटलाल हा आता आपली पत्रकारिता सोडण्याच्या तयारीत आहे. पण मग तो नेमकं आता करणार तरी काय बुवा…..
सध्या “तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेत पोपटलाल आता पत्रकारिता सोडून भाजी विकणार आहे. मालिकेतील पोपटलाल च्या लग्नाच्या प्रयत्नांच्या खिरापतींनी अगदी धूमाकळ माजवला आहे. मात्र यावेळी आता आणखी नवीन काय बुवा होणार, याची कुणीच कल्पना देखील केली नसेल. कारण आता तर चक्क पोपटलालने भाजी विकण्याचा निर्णय घेतला आहे.
गोकुळधाम सोसायटीतील कोमल भाभी, बबिताजी, माधवी भाभी यांच्यासोबत पोपटलाल भाजी व्यवसायाची योजना आखत आहे. पोपटलाल च्या भाजीपाला विकण्यामागील हेतू केवळ कमाई करणे हा नाही. तर लोकांच्या घरोघरी भाजी विक्री करताना तो आता स्वतःसाठी एक वधू सुद्धा शोधणार आहे. या प्रमुख उद्देशाने पोपटलालने भाजी विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.