“तारक मेहता…” मधील पत्रकार पोपटलाल यांनी खऱ्या आयुष्यात गर्लफ्रेंडसोबत पळून जाऊन केले लग्न; खूपच रोमॅन्टिक आहे यांची लव्हस्टोरी…
संपूर्ण जगभरात “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो चे लाखो चाहते आहेत. त्यामुळेच तर या शो चा टीआरपी देखील इतर सर्व शो च्या तुलनेत अगदी गगनाला भिडणारा आहे. हा शो एवढा सुप्रसिद्ध आहे की, प्रत्येक घरातील लहान मुलांपासून ते थोरामोठयांपर्यंत सर्वजण हा शो आवर्जून पाहतात. तसे पाहता तारक मेहता का उल्टा चश्मा मधील सर्व कलाकार हे देखील उत्कृष्ट कलाकार आहेत.
या शो मधील पत्रकार पोपटलाल जे सदानकदा आपले लग्न कधी होणार बुवा..या चिंतेत असतात. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, आपल्या रियल लाइफ मध्ये तर यांनी प्रेमविवाह केला आहे. इतकंच नव्हे तर वास्तविक जीवनात पोपटलाल यांची पत्नी खूपच सुंदर आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा मधील आपले हे अवलिया कलाकार पत्रकार पोपटलाल हे नेहमीच मॅरेज ब्युरो ला चकरा मारत असतात. आपल्या लग्नासाठी आसुसलेले पोपटलाल हे क्षणोक्षणी एखाद्या सुलक्षणी मूलीच्या शोधात असतात. तर मित्रांनो ज्येष्ठ पत्रकार पोपटलाल यांची भूमिका साकारणारे श्याम पाठक हे आपल्या खऱ्या आयुष्यात खूप वेगळे आहेत.
तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु ते खूपच रोमॅन्टिक आहेत बरं का….त्यांनी तर चक्क लव मॅरेज केले आहे. पोपटलाल म्हणजेच श्याम पाठक यांनी शाळेतील मैत्रीणीसोबत प्रेमविवाह केला आहे. त्यांची लवस्टोरी एवढी झकास आहे की तुम्ही तर आणखी त्यांचे फॅन व्हाल.
अहो त्याचे झाले असे की, श्याम पाठक व रश्मी हे दोघेही लहानपणी एकाच शाळेत शिकायचे. त्यामुळे हे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर घरातील कुणालाही काहीही न सांगता त्यांनी गुपचूप पळून जाऊन लग्न केले.
कारण त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे नाते स्वीकारले नाही. घरच्यांना वाटत होते की, श्याम व रश्मी यांनी एकमेकांना विसरून जावे. पण प्रेम तर वेडे असते. आपल्या प्रेमाखातर हे दोघेही एकमेकांना कोणत्याही परिस्थितीत विसरण्यासाठी मुळीच तयार नव्हते. नाइलाजास्तव शेवटी त्यांना घरातून पळून जाऊन गुपचूप लग्न करावे लागले.
परंतु लग्नानंतर देखील त्यांच्या घरच्यांनी या ना त्या कारणाने त्यांच्यावर नाराजी दाखवली. मात्र त्यानंतर जसजसा वेळ निघून गेला, त्याप्रमाणे श्याम व रश्मी यांनी आपल्या कुटुंबाचे मन जिंकले. तर आता हे एक सुंदर कपल आहे.
श्याम व रश्मी यांचा अगदी राजा- राणीचा जोङा शोभून दिसतो बरं…. रश्मी ह्या एक आदर्श गृहिणी आहेत. 2003 मध्ये या कपलने एकमेकांसोबत लग्न केले होते. तर या दाम्पत्याला आता दोन मुले व एक मूलगी अशी तीन मुले आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.