“साधेपणा, सोज्वळपणा असलेल्या या महान व्यक्तीला सलाम” मराठी अभिनेत्याने केली पोस्ट शेयर
टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि दिग्गज उद्योगपती म्हणून जगभरात प्रसिद्धीत असलेले रतन टाटा यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. अत्यंत साधेपणाने एक कप केक कापतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. त्यांच्या या साधेपणाचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. रतन टाटा यांच्या वाढदिवसाचा व्हिडीओ पाहिल्यावर अभिनेता किरण माने यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. किरण माने यांनी टाटांच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेयर करत म्हटले आहे की,”अगदी खरं आहे…या महान व्यक्तीच्या कृतीने अनेक जणांच्या सणसणीत कानाखाली मारली आहे.”
त्याचप्रमाणे किरण यांनी सांगितले की,”परवा माझ्या एका मित्राने त्याच्या शूटिंग सेटवरील प्रोडक्शन कंट्रोलरचा वाढदिवस साजरा करताना एक व्हिडिओ शेयर केला होता. किरण आम्ही कसला भारी बर्थडे सेलिब्रेट केला बघ.. 40- 42 केक आणून त्यात बचाबचा हात बुडवून सगळ्यांच्या तोंडावर थापून रंगपंचमी साजरी केली. सगळ्या परिसरात केकचा सङा पङला होता. हातात क्रीम घेऊन एकमेकांच्या मागे चाललेली पळापळ, केकची फेकाफेकी पाहून एवढं ङोकं सणकून उठत होतं की.. बस्स. ज्याचा वाढदिवस साजरा होत होता, त्याचे कर्तृत्व, त्याची लायकी, त्याचं कॅरेक्टर हे असे आहे की, त्या दिवशी त्याची चपलांनी पूजा केली तरी पण कमीच पडेल !!! त्याचदरम्यान गल्लीतील एका सङकछाप गुंङाने तलवारीने केक कापल्याचा एक फोटो पाहून अजूनच ङोकं सटकलं.
रतन टाटा यांच्या वाढदिवसाच्या व्हिडीओ विषयी म्हणायचे झाले, तर ते कुणीही सर्वसाधारण व्यक्ती नाही. त्यांनी चाळीस कोटी केक कापले तरीदेखील ते सुद्धा त्यांच्यासाठी कमीच आहेत. कारण तशी त्यांची कामगिरी आहे. टाटा उद्योग समूहाला नव्या दिशेने नेणाऱ्या या माणसाचा साधेपणा हा मोठमोठ्यांना थक्क करून जातो. लहानपणापासून त्यांनी आपण जमशेदजी टाटा यांचे नातू आहोत, असा आव कधीच दाखवला नाही. आपण आपल्या स्वतःच्या जीवावर उभं राहणार, हे एकमेव लक्ष्य ह्या माणसाचे होते.
इतकंच नव्हे तर आर्किटेक्ट होण्यासाठी ते जेव्हा अमेरिकेत गेले, तेव्हा त्यांनी शिक्षण घेण्यासोबतच हॉटेलमध्ये भांडी घासणं ते अगदी कारकुनाच्या नोकरी पर्यंत सारं काही केलं. पुन्हा परतल्यावर त्यांनी टाटा समूहात दाखल होण्याआधी जमशेदपूरच्या “टाटा स्टील” मध्ये कोळशाची पोती पाठीवरून वाहण्यापासून ते धगधगत्या भट्टीजवळ काम करत बसण्यापर्यंत सर्व अनुभव घेतले… त्यानंतर कंपनीची जबाबदारी हातात घेतल्यावर त्यांनी काय केलं, हे काही नव्याने सांगायची गरज नाही. रतन टाटा यांचा इतिहास संपूर्ण जगाला ठाऊक आहे. तर मित्रांनो सांगायचे तात्पर्य हे आहे की, नुकताच या व्यक्तीने वयाचा 84 वा बर्थडे साजरा केला आहे. हे सर्व पाहून आपण सगळ्यांनी स्वतःच्या एक- एक थोबाडीत मारून घेतली, तरी काही फरक पडणार नाही. कङकङीत सलाम…या थोर माणसाला..
अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात एक्टिव असतात. किरण माने हे सध्या “मूलगी झाली हो” या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारत आहे. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना एवढी आवडली की आता त्यांचे चाहते त्यांना विलास पाटील या नावानेच ओळखू लागले आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.