बाहुबली फेम प्रभासचा “आदीपुरुष” हा बिग बजेट चित्रपट या तारखेला होतोय रिलीज, जाणून घ्या कोणती आहे ती तारीख…

बाहुबली ब्लॉकबस्टर सिनेमानंतर प्रभास प्रंचड लोकप्रिय झाला होता. करोडो चाहते त्यावेळी पासून त्याचे तयार झालेले आहेत. आता तर एकामागून एक हिट सिनेमे तो घेऊन यायला लागला आहे. हिंदीत तो लवकरच एका खूप मोठ्या आणि सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या भूमिकेत दिसून येणार आहे.

त्याचा येत्या नवीन वर्षाच्या शेवटाला आदीपुरुष हा चित्रपट येत आहे. ज्यात तो कोणती भूमिका करतोय ? हा प्रश्न आपल्याला पडलाच असेल. तर चला मग जाणून घेऊयात आपल्या पडलेल्या प्रश्नांची सर्व उत्तरे.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हे नाव आता चाहत्यांसाठी नवीन राहिलेलं नाही. ‘बाहुबली’ चित्रपटातून खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेला प्रभास लवकरच आदिपुरुष या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेष म्हणजे हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार हा एकच प्रश्न चाहत्यांना पडला होता.

मात्र, आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. आदिपुरुष या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ज्यामुळे चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

मराठी माणूस असलेला ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याने आधी अनेक सिनेमे दिग्दर्शन केले आहे. ज्यात सुपरहिट असा तानाजी एक आहेच. ओम राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

त्यानुसार, ११ ऑगस्ट २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अजून बराच वेळ या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान,हा चित्रपट श्रीरामचंद्रावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटात प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, सैफ रावणाची भूमिका साकारणार आहे.

हा चित्रपट 3D अॅ’क्श’न ड्रामा प्रकारात मोडणारा असून भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. २०२२ मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

प्रभासला रामाच्या भूमिकेत पाहण्यासाठी सर्वच जण खूप उत्स्फूर्तपणे वाट पाहत आहेत. प्रभास नक्कीच भूमिका खूप उत्तम साकारेल. त्याला त्याच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment