“या” विनोदी अभिनेत्रीच्या घरी येणार लवकरच नवा पाहुणा, डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला संपन्न…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टीतील यावर्षी अनेक अभिनेत्रींना मातृत्वाचे सुख प्राप्त झाले आहे. तर आता अप्रतिम विनोदाची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर हिच्या घरी देखील लवकरच एक नवा पाहुणा येणार असल्याचे म्हटले जाते. नुकताच तिच्या ङोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. त्याचे फोटोज् तिने आपल्या सोशल मीडियावर शेयर केले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांचा भन्नाट प्रतिसाद दिसून येत आहे.

अभिनेत्री प्राजक्ता हनमघर हिने सोशल मीडियावर आपला बेबी बंप चा फोटो देखील पोस्ट केला आहे. मागील 4 वर्षांपूर्वी बार्शी येथील रजत ढाळे यांच्यासोबत प्राजक्ताचा विवाह झाला होता. रजत ढाळे हे प्रोफेशनने एक फार्मसिस्ट आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता हनमघर हिचे बालपण मुंबईतच गेले. दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर मधून तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. तर माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून तिने आपले पुढील शिक्षण घेतले. प्राजक्ता च्या विनोदी अभिनयाची शैली तर सर्वांना ठाऊकच आहे. फू बाई फू, कॉमेडी ची बुलेट ट्रेन यांसारख्या अनेक शो मधून तिने हास्यास्पद भूमिका साकारल्या आहेत.

See also  बॉलीवुड अभिनेत्री सई मांजरेकरची बहीण देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

“एका लग्नाची दुसरी गोष्ट” मधील सोनियाच्या भूमिकेमुळे ती सर्वत्र पोहोचली. त्यानंतर वादळवाट,पुणेरी मिसळ, शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकेत काम करत असतानाच तिने लूज कंट्रोल, वेङिंग चा शिनेमा, धुरळा हे चित्रपट सुद्धा केले. त्याचप्रमाणे कॉमेडीची जिएसटी एक्स्प्रेस, फू बाई फू यांसारखे विनोदी कार्यक्रम तिने आपल्या अप्रतिम विनोदांनी लोकप्रिय केले.

योगेश शिरसाठ आणि प्राजक्ता हनमघर यांच्या जोडीला आपण अनेक स्कीट्समधून पाहिले आहे. अभिनयासोबतच प्राजक्ता ने काही कुकरी शोज पण हिट केले आहेत. म्हणून तर निरनिराळे पदार्थ बनवणे व इतरांना खाऊ घालणे, हे जणू तिचे आवडीचे काम बनले. “बस्ता” या चित्रपटात प्राजक्ता ने एक विरोधी भूमिका साकारली होती, जी तिच्या चाहत्यांना खूपच भावली होती. तर 1 एप्रिल 2022 रोजी प्राजक्ता चा “हवाहवाई” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण, नाव ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment