‘या’ कारणांमुळे प्रकाश आंबेडकर पुढील 3 महीने सक्रिय राजकारणापासून राहणार दूर
मुंबई: वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली असून, ते पुढील 3 महीने सक्रिय राजकारणापासून दूर राहणार असल्याची माहिती दिली . समाज माध्यमांवर व्हिडिओ चित्रफीत जारी करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
येणार्या काळात लवकरच 5 जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कार्याकर्त्या मध्ये काही संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी महाराष्ट्र अध्यक्षपदाची धुरा रेखाताई ठाकुर यांच्याकडे सोपवली आहे.
व्यक्तीगत कारणांमुळे 3 महीने राहणार राजकारणापासून दूर
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, “मी स्वतः पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमात पुढील 3 महिन्यांसाठी कार्यरत राहू शकणार नाही. माझ्या व्यक्तीगत कारणांमुळे मी हा निर्णय घेत आहे. पक्ष आणि संघटन चालले पाहिजे. पाच जिल्ह्यात निवडणुका आहेत. पक्षाला अध्यक्ष असणं गरजेचे आहे. म्हणून मी रेखाताई ठाकुर यांच्याकडे हा भार सोपवत आहे.”
नवी प्रभारी अध्यक्षांना सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली
“पक्षातील सर्व लहान-मोठे कार्यकर्ते आणि नेते रेखाताईंची मदत करतील आणि निवडणुकीत पक्ष यशस्वीरित्या विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. आपण सगळेजण रेखाताईंना सहकार्य कराल.” अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांनी याची नोंद घ्यावी ही विनंती! @VBAforIndia pic.twitter.com/pezJFwou9y
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 8, 2021