म्हणून मला आवडतात बाळासाहेब; प्रमोद महाजनांनी केला होता भर सभेत खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आजच्या घडीला शिवसेना आणि भाजपचं नातं विळ्या-भोपळ्याचं असलं तरी गेली 3 दशकं शिवसेना आणि भाजप सख्ख्या भावासारखे होते. या नात्यात पडलेल्या फुटीला 1 चं गोष्ट प्रामुख्याने कारणीभूत आहे, ती म्हणजे राज्यातील दोन्ही पक्षांचे नेते आणि त्यांच्यातील संबंध.

गेल्या 5-7 वर्षांमध्ये शिवसेनेची ताकद आहे तेवढीच राहिली मात्र भाजपची ताकद वाढली होती. एकेकाळी भाऊ असलेले दोन्ही पक्ष नेमकं मोठं कोण? यावरून झगडू लागले. मात्र मुद्दा इथेही नव्हता. मुद्दा दोन्ही पक्षातील नेत्यांमधील संबंधांचा होता. एकमेकांना धरून राहणे आणि पूरक राजकारण करणे, अशी सवय दोन्ही बाजूंच्या नेत्यांची होती. बाळासाहेबांचा कितीही वचक असला तरीही भाजपचे जेष्ठ नेते प्रमोद महाजन आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे त्यांचे जवळचे मित्रही होते.

मात्र काळ बदलला, नेते बदलले आणि दोन्ही पक्षांमध्ये शीतयुद्ध सुरु झाले. असं म्हटलं जातं की, गेल्या 20 वर्षांपूर्वीचा काळ हा खऱ्या अर्थाने समाजकारण आणि राजकारणाचा होता. आता समाजकारण संपून त्यात फक्त राजकारण उरलं आहे. बाळासाहेबांचे सर्वपक्षीय मित्र होते. अगदी शरद पवारांपासून तर महाजनांपर्यंत सगळेच.

See also  सभागृहात गैरवर्तन केल्या प्रकरणी भाजपचे 'हे' 12 आमदार निलंबित

शरद पवारांच्या आणि बाळासाहेबांच्या राजकीय आणि वैयक्तिक मैत्रीचे किस्से आजही चवीने चर्चीले जातात. मात्र प्रमोद महाजन आणि बाळासाहेब यांचेही संबंध राजकारणापलीकडचे आणि घनिष्ट होते. आणि त्यामुळेच भर सभेत महाजनांनी आपल्याला बाळासाहेब ठाकरे का आवडतात? का भावतात? याविषयी सांगत त्यांच्या घनिष्ट मैत्रीचे दर्शन उभ्या महाराष्ट्राला घडवून दिले.

साधारण पंधरा- सोळा वर्षांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निमित्त होते राज ठाकरेंनी बनवलेल्या फोटो बायोग्राफीचं. राज हे आपल्या काकांसारखेच कलासक्त आहेत तर उद्धव यांच्याही अंगी फोटोग्राफीची कला होती. राज यांनी बनवलेल्या या फोटो बायोग्राफी कार्यक्रमाच्या निमित्ताने तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, बाळासाहेबांचे मित्र आणि राजकीय विरोधक शरद पवार, सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन, बाबासाहेब पुरंदरे आणि गानकोकीळा लता मंगेशकर उपस्थित होत्या.

See also  ‘त्या’ मुलीच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीत दोषी आढळलो तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, माजी मंत्री संजय राठोड यांचे वक्तव्य

यावेळी महाजन यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब आपल्याला का आवडतात, हे सांगत राहिले आणि कार्यक्रमात टाळ्यांचा कडकडाट होता राहिला. महाजन म्हणाले की, मला बाळासाहेब का आवडतात, तशी तर पुष्कळ गोष्टी आहेत मात्र मी त्यातील मोजक्या 5 गोष्टी तुम्हाला सांगतो.

  • कदाचित हा असा एकमेव नेता आहे की, ज्याच्या ओठात आणि पोटात काहीही अंतर नसतं. हा पूर्ण पारदर्शी नेता आहे.
  • हिंदुस्थान सोडा हो, जगाच्या इतिहासात मी असं बोललोच नव्हतो, असा खुलासा करणारा एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे.
  • बाळासाहेबांनी जरी 75 वय ओलांडले असले तरी शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या सभेचं वय 25 पलीकडे गेले नाही. आजही सगळे पंचविशीतलेच तरुण बाळासाहेबांच्या सभेला उपस्थित असतात.
  • मराठी माणसं एकत्र येत नाहीत, अशी चर्चा सगळीकडे होत असते, मात्र शिवसेना स्थापन करून मराठी माणसाला एकत्र आणण्याचा पराक्रम बाळासाहेबांनी केला.
  • हिंदू म्हणजे किराणा दुकान, किराणा दुकानात सगळं असत पण किराणा मिळत नाही. तसेच हिंदुत्वात सगळे असतात पण हिंदू असत नाहीत. हिंदू हे हिंदूंना कधीच मत देत नाहीत हिंदू हे जातीवर मत देतात. हिंदुस्थानच्या इतिहासात हिंदू हे हिंदू म्हणून मत देऊ शकतात, हे सिद्ध करणारा बलाढ्य नेता म्हणजे बाळासाहेब.
See also  पंढरपूरला जाणार्‍या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांनी केला टीकांचा वर्षाव, वाचा कोण काय म्हणाले?

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Ram

Ram

Leave a Comment