हा प्रसिद्ध अभिनेता नवीन गाडी घेताना आपली वापरलेली गाडी एखाद्याला फुकट देतो, कारण वाचून कौतुक वाटेल…!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘मुळशी पॅटर्न’ इ. या चित्रपटांमुळे महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचलेले नाव म्हणजे ‘प्रवीण तरडे’. सोशल मीडियावरही त्यांचे नाव चर्चेत आहे. आणि आता त्यांचेच अजून एक प्रकरण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहे.

अभिनेते प्रवीण तरडे याचं नाव सध्या मीडियात या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहत आहे. अभिनेता-दिग्दर्शक असणारे प्रवीण तरडे सोशल मीडियावरही लोकप्रिय आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ असो वा ‘धर्मवीर’ किंवा ‘सरसेनापती हंबीरराव’ हे अलीकडचे चित्रपट असो, तरडे यांनी अभिनय क्षेत्रात त्यांचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे.

आता या क्षेत्रात अनेक स्टारकिड्स मोठ्या बॅनरखाली काम करताना दिसतात. पण असे कलाकार देखील आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत स्वतःहून स्वतःचे नाव कमावले आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रवीण तरडे. त्यामुळे आता अभिनयात आपलं करियर करू पाहणाऱ्या, आणि नुकत्याच करियर ची सुरूवात झालेल्यांबद्दल मला आपुलकीची भावना आहे, असे प्रवीण तरडे सांगतात.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुग्धा गोडसेने लग्नाच्या २ वर्षानंतर पतीबद्दल केला मोठा खुलासा, ऐकून थक्क व्हाल!

प्रवीण तरडेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामधे ते म्हणतात की, ‘जे लोक संघर्ष करतात त्यांना मी नेहमीच मदत करतो. माझ्या संघर्षात मला कोणी मदत करावी असे मला वाटत नाही, मी ते घ्यायचो पण नाही. स्वाभिमान पण असतो. म्हणूनच मी न मागता मदत करतो जेणेकरून कोणाचाही स्वाभिमान दुखावला जाऊ नये. मी त्यांना परस्पर मदत करत असतो.’

या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या कारची कहाणी सांगितली आहे. ते म्हणतात की मी कधीच जाणूनबुजून कार विकत नाही या वस्तुस्थितीबद्दल सांगताना ते म्हणतात, “बरीच वर्षे पैसे वाचवून मी माझी पहिली दुचाकी खरेदी केली.  आणि त्यांनतर या इंडस्ट्रीत धडपडणाऱ्या कलाकाराला मी ती दिली. दुसरी दुचाकीही मोठ्या कारसह अन्य एका स्ट्रगलरला देण्यात आली. अशा प्रकारे मी माझी जुनी कार जाणूनबुजून कधीच विकत नाही. कारण ज्या नशिबाने मला ती गाडी दिली त्या कलाकाराला देखील ते मिळावं असं मला वाटतं.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीचा पती अभिनय नाही तर करतो हे काम, ऐकून तुम्हालाही विश्वासच बसणार नाही...

या कलाकारांच्या संपर्कात सुद्धा प्रवीण तरडे नेहमीच असतात आणि असा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते अत्यंत भावूक दिसत आहेत. ते नेहमी नवोदितांना फोन करतात, त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेबद्दल विचारत असतात. प्रवीण तरडे यांनी उत्तर दिले आहे की, नवीन मुलाला आपण जे काही भोगले आहे, ते त्याला भोगावे लागू नये त्यासाठी त्याला मदत केली पाहिजे असे वाटते.

13 मे रोजी रिलीज झालेला ‘धर्मवीर’ आणि 27 मे रोजी रिलीज झालेला ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. दोन्ही चित्रपटांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे मुव्हीजचे आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्येही त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हे दोन्ही चित्रपट मराठी प्रेक्षकांना खूप आवडले आहेत.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment