भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे कलाम संपत्ती किती होती? संपत्तीची रक्कम ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

भारताचं सर्वोच्च पद सांभाळलेल्या व्यक्तीकडे काय असेल ? असा साधा प्रश्न जर विचारला, तर आपला सर्वसामान्य समज सांगेल, की गाडी, बंगला, पैसा, देश-विदेशात उद्योजकता आणि बरच काही. पण आपल्याला माहिती आहे का ? की आपल्या देशात एक असे महान व्यक्ती होऊन गेले आहेत, ज्यांनी 11 व्या राष्ट्रपतीच्या रुपात देश सांभाळला.

त्यासोबत तरुणांच्या प्रेरणादायी विचारांचा भारत घडवला. ज्याची मुळं आज ते हयात नसतानाही मजबूत आहेत. आज आपण ज्यांच्याविषयी बोलतोय, त्यांचं नाव आहे, भारताचे 11 वे राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. साधं राहणीमान आणि उच्च विचार, असं त्यांचं व्यक्तीमत्व. जे आज देशातील सर्वांच्या मनातील प्रेरणादायी विचारांचा आदर्श आहे.

See also  कोणत्या राशी इंटरनेटवर काय सर्च करतात? जाणून घ्या, प्रत्येक राशीच्या स्वभावानुसार त्या राशींच्या लोकांना काय पाहायला आवडते?

आपलं संपूर्ण आयुष्य साधेपणाने घालवलेल्या अब्दुल कलामांची संपत्ती काहीच नव्हती. आज आपण पाहिलं तर मोठं पद सांभाळलेल्या व्यक्तीच्या हयात नसताना आणि असताना, संपत्ती किंवा इतर अनेक गोष्टींवरून वाद होतो. पण कलामांच्या संपत्तीमध्ये कोणतीही अशी एकही गोष्ट नव्हती, ज्यावरून वाद होऊ शकेल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून त्यांनी यश उभं केलं; पण कधीच त्याचा अहंकार बाळगला नाही, हेच त्यांचं मोठेपण.

भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी त्यांनी खुप मोठे योगदान दिले आहे. आपल्या विज्ञाननिष्ठ, प्रेरणादायी विचारांसाठी आणि असामन्य व्यक्तीमत्वासाठी प्रसिद्ध असलेले डॉक्टर कलाम सदैव आठवणीत तसेच राहतील. आजही अनेक तरुणांचे एपीजे अब्दुल कलाम प्रेरणास्थान आहेत. देशासाठी अमूल्य असं योगदान दिलेल्या अब्दुल कलामांची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे, भारतीयांच्या अश्या पिढ्या आहेत, की ज्यांना त्यांनी स्वप्न पहाण्यासोबतच ती सत्यात उतरवून पुढे जाण्यास शिकवलं.

See also  लग्नासाठी मुलाची उंची मुलीपेक्षा जास्त का असावी, त्यामागे आहे हे शास्त्रीय कारण, कारण ऐकून थक्क व्हाल!

लढणं कधी थांबायचं नसतं. खरं तर त्यांनी खचून न जाता कसं लढायचं ? हेही शिकवलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अनेकदा कलामांच्या संपत्तीवरून चर्चा केल्या जातात. परंतु तुम्हाला माहीत आहे का ? खरंच कलामांकडे किती संपत्ती होती ? चला तर मग जाणून घेऊया कलामांची संपत्ती कोणती ? आणि किती ?

आपलं संपूर्ण आयुष्य साधेपणाने घालवलेल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलामांची संपत्ती काहीच नव्हती. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल; पण हे सत्य आहे.

किती संपत्ती ? जर त्यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं म्हंटलं तर फ्रिज, टीव्ही, गाडी आणि एसीही त्यांच्याकडे नव्हता. कलामांकडे फक्त संपत्तीच्या रूपायांमध्ये 2500 ची पुस्तकं, एक घड्याळ, 6 शर्ट, चार पॅन्ट आणि एक बुटांचा जोड होता. एवढचं होतं. विश्वास बसणार नाही, असं देशातीलचं नाहीतर जगातील एकमेव व्यक्तिमत्त्व.

See also  तुम्हाला माहिती आहे का ? IAS आणि IPS या दोन्हींमध्ये काय आहे फरक ? कुणाकडे आहे जास्त अधिकार ?

ऐशो आरामात जगणं त्यांना मान्यचं नव्हतं. कारण त्यांचं एकच तत्व होतं, की अन्न, वस्त्र आणि निवारा सोडून अजून काय लागतं ? हेच जगण्याचं खरं उत्तर. अश्या प्रेरणादायी विचारांच्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना कडक सलाम ! खूप अभिमान आणि आज जरी ते शरीराने सोबत नसले तरी विचारांनी कायम सोबत आहेत. देशाच्या.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment