“गप तूच मला मा’रले’ प्रिया बापटच्या पोस्टवर सिद्धार्थ चांदेकरने का बरं केला असा रिप्लाय, काय घडलं बरं नक्की…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर सगळे सेलिब्रिटीज हे नेहमीच एक्टिव असतात. चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया हे एक उत्तम माध्यम आहे. त्यामुळे फॅन्सला सुद्धा आपल्या सेलिब्रिटीज विषयी सगळ्या गोष्टी ताबडतोब समजतात. सध्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री प्रिया बापट हे सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

प्रिया बापट आणि सिद्धार्थ चांदेकर यांची “सिटी ऑफ ङ्रिम्स” ही वेबसिरीज खूप गाजली होती. “सिटी ऑफ ङ्रिम्स” चा पहिला सिझन 13 मे 2019 मध्ये रिलीज झाला होता. याच वेबसिरीजचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापट हे मुख्य भूमिकेत दिसतील. त्यांच्यात मोठा लढा दाखवला जाणार आहे. या वेबसिरीज मध्ये सिद्धार्थ चांदेकर हा या वेबसिरीज मध्ये झळकणार आहे का? असे प्रश्न त्याचे चाहते विचारत आहेत.

See also  'तुझ्यात जीव रंगला' मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीने एका वर्षापूर्वीच या अभिनेत्यासोबत केला होता साखरपुडा, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

दुसऱ्या भागात प्रिया बापट आणि सिद्धार्थ चांदेकर यांसोबत अभिनेते सचिन पिळगावकर, संदेश कुलकर्णी, अजाज खान ही स्टारकास्ट आहे. नागेश कुकुनूर यांनी दिग्दर्शन केले होते. दरम्यान याच वेबसिरीजचा फोटो सिद्धार्थ चांदेकर याने सोशल मीडियावर शेयर केला आहे.

तर अभिनेत्री प्रिया बापट हिने “सिद्धया” अशी गंमतशीर कमेंट केली आणि यावरच सिद्धार्थने पण एक गंमतशीर कमेंट केली आहे. “गप तूच मला मा’रले” असा रिप्लाय त्याने दिला आहे. सिद्धार्थच्या या रिप्लायवर चाहते सुद्धा भरपूर कमेंट करत आहेत. सिद्धार्थ चांदेकर च्या या रिप्लायने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

सध्यातरी या वेबसिरीजच्या ट्रेलरला देखील रसिकांची प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. या दुसऱ्या सिझनमध्ये लेक आणि वङिलांमध्ये सत्तेचा खेळ कशाप्रकारे रंगतो, हे दाखविण्यात येणार आहे. सत्तेच्या लोभापुढे सर्व नाती ही छोटी असतात. एखादा राजकारणी याच लालसेपोटी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो.

See also  बिहारमध्ये शिकतोय सनी देओल आणि प्रियंका चोप्राचा मुलगा, सध्या देतोय १२ वीची परीक्षा...

तसेच त्याची मूलगी पण त्याला कशाप्रकारे टक्कर देते, हे देखील या सिरीजमध्ये दाखवले आहे. या वेबसिरीजचा उत्कृष्ट अभिनय तितकीच सुंदर कथा असल्याने ही वेबसिरीज खूपच गाजली होती. तर आता दुसऱ्या सिझनचा ट्रेलर पाहून चाहत्यांना सुद्धा ही वेबसिरीज पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment