प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या रोमॅन्टिक पोजवर सेलीब्रेटींची प्रतिक्रिया, पहा काय म्हणतायेतं हे सेलीब्रेटी!

बापटांची प्रिया असं नुसतं म्हटलं जरी तरी प्रिया बापट या अभिनेत्रीबद्दल सार काही बोलण्यास अनेक शब्द ओठांवर येतात. अर्थातचं मराठी सिनेसृष्टीत प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या लग्नाची व त्याचप्रमाणे दोघांच्या प्रेमकहानीची गोड बात सर्वांना एव्हानापर्यंत ठाऊक आहेच. तर अशी ही धम्माल, रोमॅन्टिक, क्यूट, साजिरी जोडी सोशल मीडियावर एका फोटोने धुमाकूळ घालताना दिसत आहे.

प्रिया बापटने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून जबरदस्त व भन्नाट तिचा आणि सोबतच उमेश कामत दोघांचा एकत्र असा फोटो शेअर केला आहे. मराठी सिनेसृष्टीत आज जर सदाबहार राहणारं कपल म्हणून कोणाची ओळख असेल तर ते निश्चितच प्रिया आणि उमेश हे दोघेच आहेत. दोघे बऱ्याचदा एकमेकांचे फोटो एकमेकांच्या अकाउंटवरून शेअर करतही असतात.

नुकतेच प्रियाने जे फोटो शेअर केलेत, त्यावरून समजूनच येतं की आजवर त्यांची चालू असलेली नात्यातल्या केमिस्ट्रीची प्रचिती येते. फोटोमधून साहजिकचं दोघांची जबरी बॉन्डींग आपल्याला पहायला मिळते आहे. या दोघांच्या फोटोंवर अनेक सेलीब्रेटींनी कमेंट्सचा जोरदार वर्षाव केला आहे. सोशल मीडियावरही या दोघांच्याच फोटोची सर्वत्र चर्चा रंगलेली पहायला मिळते आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या खऱ्याखुऱ्या केमिस्ट्रीवर आधारित जणू वेबसिरीजही येऊन गेली होती. “आणि काय हवं” या मराठी एम एक्स वरील वेबसिरीजच्या माध्यमातून लग्नानंतर केवळ दुसऱ्यांदाच दोघांनी एकमेकांसोबत काम केल्याच पहायला मिळालं होतं. त्याआधी 2013 साली आलेल्या टाईम प्लीज या चित्रपटातूनही दोघे एकत्र सर्वांच्या भेटीला पडद्यावर आले होते. दोघांचा विवाह हा 2011 साली संपन्न झाला होता.

उमेश आणि प्रिया दोघांनी एकमेकांना तब्बल सहा वर्षे डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय झाला होता. या जोडीच्या बाबतीत खास गोष्ट म्हणजे अशी की, चक्क प्रियाने समोरून उमेशला प्रपोज केला होता. दोघेही इंडस्ट्रीमधे चांगल्या प्रकारे कार्यरत होते, नंतर एकत्र येऊन मैत्री झाली. आणि हळूहळू गोष्टी पुढे घडत गेल्या.

दोघे प्रेमात पडल्यावर उमेश कामत कदाचित आपल्या थोड्याशा लाजऱ्या स्वभावामुळे प्रियाला प्रपोज करायला पुढे सरसावू शकला नसावा. पण अगदी बिनधास्त आणि धाकड स्वरूपाची प्रिया मात्र मागे न हटता थेट प्रपोज केला. आणि उमेश कामतने थेट तिच्या वाढदिवसाला तिला बर्थडे गिफ्ट थेट प्रपोजचा होकार कळवला होता. प्रियाने जो फोटो शेअर केला आहे त्यावरील कंटेंट हा खुपच हळवा करून जाणारा ठरतो.

तिने म्हटलंय की, मी 2020 मधे जर जगू शकले नाहीत आहे तर त्याच कारण सर्वस्वी उमेश कामत आहे. उमेश प्रत्येकाची काळजी अगदी जीवापाड घेत आला आहे. पुढे तिने असही म्हटलं आहे की, मला ठाऊक नाही मी तुझ्यावर कितपत प्रेम करते. पंरतु तुझ्यासाठी तुला अभिमान वाटेल असचं काम मी करत राहिन. उमेश आणि प्रिया दोघांच्या वयात तब्बल 8 वर्षांच अंतर आहे.

या एका कारणासाठी उमेश सुरूवातीला थोडा चिंतीत होता आणि त्यामुळे दोघांना लग्न करायला 6 वर्षांचा वेळ लागला. फायनली एकदाचं दोघांचा विवाह चांगल्या पद्धतीने संपन्न झाला तो 2011 साली. त्यानंतर सर्वांना माहितच आहे उमेश आणि प्रिया दोघे एकमेकांचे फोटोज शेअर करत असतात. आणि दोघांच्या फोटोंवर चाहत्यांसोबतच अनेक सेलीब्रेटीज लाईक्स आणि कमेंट्सचाही वर्षाव करत असतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment