प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे ही अभिनेत्री करणार करणार ‘या’ पक्षात प्रवेश, जाणून घ्या कोणता आहे तो पक्ष!

.

महाराष्ट्र सध्या करोना मुळे खुप अडचणींचा सामना करत आहे. या रोगाच्या प्रतिरोधाच्या लढाई साठी सरकार अनेक पाउलं उचलताना दिसत आहे; पण असे असताना राजकीय हालचाल मात्र खुप वेगानं घडत आहेत. काल भाजप ने राज्य कार्यकारिणी जाहीर केली. भाजप राजकीय फेरबदल करत असताना राष्ट्रवादी कश्याला मागे राहील? राष्ट्रवादी मध्ये सुद्धा हालचाल वेगानं होत आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री, निर्मिती प्रमुख आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार आहेत. यांच्यासह पुण्यातील अनेक कलाकार प्रवेश करणार आहेत. यामध्ये अभिनेते सिद्धेश्ववर झाडबुक्के, लावणी सम्राट शकुंतला बाई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक आणि दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, आणि निर्माते संतोष साखरे हे देखील राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार आहेत.

ह्या सर्व प्रसिद्ध कलाकारांना राष्ट्रवादी च्या सांस्कृतिक विभागा मार्फत काम करावं लागणार आहे. सध्या परिस्थिती अवघड होत चालली आहे. करोना मुळे मनोरंजन क्षेत्रात तर सुतक पडल्यासारखं झालेलं आहे. सगळी कामे बंद पडलेली आहेत. यामुळे पडद्यावर आणि त्याच्या आड काम करणाऱ्या सर्व कलाकारांच्या आयुष्यात जगण्याच्याच प्रश्न उद्धभवलेला आहे.

“मला या कलाकाराचं आयुष्य सध्या बघवेनासं असं झालं होतं. त्यांना माझ्यापरी सगळी मदत मी करतेच आहे. पण अजूनही जास्त मदत मिळाली तर त्यांचं जीवन पुन्हा योग्य मार्गावर येईल अशी मला आशा आहे. माझ्या मुलाचं शिक्षण पुण्यात झालेलं आहे. माझं हॉटेल सुद्धा पुण्यातच आहे. त्यामुळे मला पुण्यातून मदतीच्या कामाचा शुभारंभ करायचा आहे. यासाठी सध्या सत्तेवर असलेला राष्ट्रवादी पक्ष योग्य आहे असं माझं मत आहे. म्हणून मी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करून एका नवीन कार्याला सुरुवात करणार आहे. यासाठी मला सर्व दिगग्ज नेत्यांची मोलाची मदत लागणार आहे. असं प्रिया बेर्डे या अभिनेत्री ने आपलं मत मांडले आहे.

प्रिया बेर्डे ही प्रसिद्ध दिवंगत अभिनेता लक्ष्मण बेर्डे याची पत्नी. तिला अभिनय हा एक मुलगा आहे. ती सध्या आपल्या पुण्याच्या घरी राहत आहे. त्या 7 जुलै ला खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या उपस्थितीत पुण्याच्या मार्केट यार्ड परिसराच्या ऑफिस मध्ये जाहीर प्रवेश करणार आहे. निसर्ग या पक्षाच्या कार्यालयात प्रवेश होणार आहे.

राजकीय ही बातमी नक्कीच धक्कादायक स्वरूपाची आहे; पण भारताच्या राजकीय कारकिर्दीचा इतिहास पहिला तर हे काही नवीन नाही. अनेक दिगग्ज अभिनेते अभिनेत्री आज भाजप आणि काँग्रेस या पक्षात आहेत. यातील स्मृती इराणी सारखे काही तर चक्क केंद्रीय मंत्री आहेत.

प्रिया बेर्डे आणि इतर अनेक कलावंताचा आता अभिनया सोबत राजकारणाचा प्रवास सुरु होत आहे. त्यांच्या हातून चित्रपट वर रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्याच्या बाबत चांगली कामे व्हावी हीच माफक अपेक्षा..

Leave a Comment