अबब ! अभिनेत्री प्रियांका चोप्रा इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी घेते तब्बल इतके कोटी रुपये, रक्कम ऐकून थक्क व्हाल!
आपण सोशल मीडिया वापरतो खरं पण त्याबद्दल माहिती जाणून घ्यायलाच विसरतो. कारण आपल्याला माहिती आहे का ? आज सोशल मीडियावर पोस्ट करून अनेक फोल्लोअर्स असणारे सेलिब्रिटी घेतात करोडो रुपयांचं मानधन. होय आज आम्ही अश्याच गोष्टी ची माहिती देणार आहोत.
इन्स्टाग्रामवर आपण अनेक सेलिब्रिटी लोकांना किंवा त्यांच्या पोस्ट ला स्वखर्चाने नेट बॅलन्स मारून लाईक, कॉमेंट करतो आणि तिकडे ते कमवत राहतात करोडो रुपये. आता आपण म्हणाल कसे ? तर तेच तर जाणून घेणार आहोत. चला मग सविस्तर.
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जवळपास दोन दशकं आपल्या दर्जेदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रियांकानं हॉलिवूड सिनेसृष्टीतही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
प्रियांका सध्या यशाच्या शिखरावर आहे. (social media post) अन् त्यामुळेच तिचा सोशल मीडियावरील भाव देखील कमालीचा वाढला आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण प्रियांका एका पोस्टसाठी तब्बल तीन कोटी रुपयांपर्यंतच मानधन घेते.
हॉपरएचक्यू या वेबसाईटनं सोशल मीडियावरील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहिर केली आहे. या सेलिब्रिटींना इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यासाठी किती रुपयांचं मानधन दिलं जातं याचं संशोधन त्यांनी केलं. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा 27 व्या स्थानावर आहे.
वेब साईटनं केलेल्या दाव्यानुसार तिला एका पोस्टसाठी कमीतकमी 3 कोटी रुपयांचं मानधन दिलं जातं. या यादीत विल स्मीथ, डेव्हिड बेकम, एमा वॉटसन यांसारखे अनेक नामांकित हॉलिवूड सेलिब्रिटी आहेत. परंतु लक्षवेधी बाब म्हणजे या सर्व सेलिब्रिटींच्या वर एका भारतीय अभिनेत्रीनं स्थान मिळवलं आहे. त्यामुळं चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
या यादीत एकूण 395 सेलिब्रिटींचा सामावेश करण्यात आला आहे. या यादीत पहिल्या तीस सेलिब्रिटींमध्ये केवळ दोन भारतीय आहेत. प्रियांकासोबत भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याची वर्णी लागली आहे. तो 19 व्या स्थानावर आहे. त्याला एका पोस्टसाठी जवळपास पाच कोटी रुपये दिले जातात.
बघितले का किती पैसे दिले जातात. तर अशी आहे इंस्टा ग्राम ची खरी ओळख. आज सोशल मीडियाला फार महत्व आलेलं आहे. आता पुढे अजूनही येणार आहे. त्यामुळे हा भाव सतत सेलिब्रिटी लोकांचा वाढतच जाणार आहे.
बघुयात आता कोण ही माहिती वाचून प्रेरणादायी होऊन पुढील आयुष्य उजवल करून मोठा सेलिब्रिटी होतय आणि असे यादीत नाव कमावतय. कारण सगळं शक्य आहे. स्टार मराठी कडून स्टार शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.