अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या आलिशान रेस्तरॉंटचे आतले फोटो पहिले का? रेस्तराँचा मेन्यू झालाय प्रचंड व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा परदेशात राहत असली तरीही भारत आणि इथल्या खाद्यपदार्थांबद्दलचं तिचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. म्हणूनच की काय तिनं आता न्यूयॉर्क येथे भारतीय पद्धतीचं रेस्तराँ सुरू केलं आहे. प्रियांका चोप्राच्या ‘सोना’ रेस्तराँचा मेन्यू आला समोर.

प्रियांकाच्या रेस्तराँमध्ये अस्सल भारतीय चवीच्या डोशापासून ते भज्जीपर्यंत अनेक पदार्थांची आहे रेलचेल. प्रियांकाच्या ‘सोना’ रेस्तराँमध्ये काय- काय मिळतं? इथे पाहा डोसा आणि भज्जीसह इतर मेन्यू…

965192 priyanka chopra

सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा परदेशात राहूनही भारताचं नाव उंचावत आहे. अभिनय क्षेत्रात घवघवीत यश मिळवल्यानंतर प्रियांका आता व्यवसाय क्षेत्रात उतरली आहे. नुकतंच तिनं अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात रेस्तराँ सुरू केलं आहे. मागच्या काही दिवसांपासून प्रियांकाच्या या रेस्तराँची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. हे रेस्तराँ आता सर्वांसाठी खुलं झालं आहे. या रेस्तराँमध्ये भारतीय पदार्थ असणार हे तर प्रियांकानं आधीच स्पष्ट केलं होतं पण इथला नेमका मेन्यू काय आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

See also  सोनाक्षी सिन्हा पेक्षाही खूपच सुंदर दिसते तिची वहिनी, सौंदर्याच्या बाबतीत देते बॉलिवूड अभिनेत्रींनाही ट'क्कर...

प्रियांकानं अमेरिकेत भारतीय पद्धतीचं रेस्तराँ सुरू केलं आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. या रेस्तराँ मन्यू आता समोर आला आहे. प्रियांकाच्या या रेस्तराँमध्ये अनेक भारतीय खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. अगदी दक्षिण भारतापासून ते उत्तर भारतामध्ये मिळणारे अनेक पदार्थ प्रियांकाच्या रेस्तराँच्या मेन्यूमध्ये आहेत. ज्यात दही-कचोरी, कोफ्ता-कोरमा, कुल्चा, फिश करी, बटर चिकन, डोसा, भज्जी, गाजरचा हलवा अशा अनेक भारतीय खाद्यपदार्थांचा समावेश आहे. तसेच या ठिकाणी सर्वांची आवडती पाणीपुरी सुद्धा मिळणार आहे.

PC Restaurant

“वोग” मासिकाला दिलेल्या मुलाखतीत या रेस्तराँचे शेफ हरी नायक यांनी या रेस्तराँच्या मेन्यूमध्ये गाजराच्या हलव्याचा समावेश असावा हे आमचं अगोदरच ठरलं होतं. तर प्रियांकानं यात पाणीपुरीचा सुद्धा समावेश करण्याचं सुचवलं होतं असा खुलासा केला. ते म्हणाले, ‘प्रियांकाने भारतातील अनेक पदार्थ चाखले आहेत. रेस्तराँच्या मेन्यूमध्ये पाणीपुरी असावी ही कल्पना प्रियांकाची होती. पार्टी स्टार्ट करण्यासाठी स्टार्टर उत्तम असावा आणि यासाठी पाणीपुरीपेक्षा अधिक चांगलं काही असू शकत नाही असं तिचं मत आहे.”

See also  अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या मुंबईतील घरी भाड्याने राहते ही बॉलीवूड अभिनेत्री, एका महिन्याचे भाडे ऐकून थक्क व्हाल!

दरम्यान परदेशात असलेल्या या रेस्तराँचं नाव प्रियांकाने ‘सोना’ असं का ठेवलं याबाबत सर्वांना उत्सुकता होती. पण हे नाव कसं सुचलं आणि विशेष म्हणजे रेस्तराँसाठी हे नाव कोणी आणि का सुचवलं याचा खुलासा या रेस्तराँचे को-ओनर मनिष गोयल यांनी केला. ते म्हणाले, ‘रेस्तराँचं नाव ‘सोना’ ठेवावं ही कल्पना प्रियांकाचा पती निक जोनसची होती.

81590475

त्यानं हा शब्द त्यांच्या लग्नात भारतीय पद्धतीचे विधी करतेवेळी अनेकदा ऐकला होता. आम्ही जेव्हा रेस्तराँच्या नावाचा विचार करत होतो. त्यावेळी आम्हाला हे नाव भारतीय असावं असा आमचा आग्रह होता. पण त्याचवेळी त्याचा उच्चार सोपा आणि गुगलवर सर्च करण्यासाठी सुद्धा काही अडचण येणार नाही असं नाव हवं होतं. निकनं ‘सोना’ हे नाव सुचवलं जे या सर्व अटींमध्ये बसणारं होतं.’

See also  कधीकाळी वडिलांच्या टी-स्टॉल शेजारी मिसळ पाव विकायचा, आज आहे इंडियाचा सुपर डान्सर आणि करोडोंचा मालक...

करोना व्हायरसचं संक्रमण वाढत असतानाही प्रियाकांच्या या रेस्टॉरन्टमध्ये चांगलीच गर्दी होताना दिसत आहे. या रेस्टॉरन्टच्या मेन्यूमध्ये भारतीय पदार्थांचा काळजीपूर्वक समावेश करण्यात आला आहे. मेन्यूमध्ये दही-कचोरी, कुल्छा, बकेट व्हीट भेल, बटर चिकन, कोफ्ता-कोरमा, फिश करी यासोबत अनेक भारतीय पदार्थांचा समावेश आहे. या सर्वच भारतीय पदार्थांनी परदेशी खवय्यांना अस्सल भारतीय चवीच्या अक्षरशः प्रेमातच पाडलेले दिसत आहे.

9036d351535c8c752c39d12a36310150386ab

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment