‘पुण्यश्लोक अहिल्या बाई’ मालिकेत अहिल्याबाईंची भूमिका साकारणारी मराठमोळी गोंडस बालकलाकार आहे तरी कोण?

आजपर्यंत टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावर अनेक ऐतिहासिक मालिका सादर झालेल्या आहेत. परंतु कालपासून सुरू झालेल्या एका ऐतिहासिक मालिकेकडे मात्र साऱ्यांचंच लक्ष लागून राहिलं होते. ही मालिका म्हणजे “पुण्यश्लोक अहिल्याबाई”.

यातील छोट्या अहिल्याच्या भूमिकेसाठी अक्षरशः हजारो मुलींनी ऑडिशन दिली होती. या हजारों मुलींमधून अखेर मराठमोळ्या अदिती जलतरेची छोटी अहिल्या म्हणून निवड झाली आहे. चला तर मग, जाणून घ्या कोण आहे ही ‘अहिल्या’.

ahilyabai show

पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत बालकलाकार अदिती जलतरेची निवड कशी झाली हेही फार रंजक आहे. ही ऐतिहासिक मालिका दि. ४ जानेवारीपासून सोनी टीव्हीवर सुरू झाली आहे. या मालिकेत अदिती जलतरे ही बालकलाकार अहिल्याबाई होळकरांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

विशेष म्हणजे या मालिकेसाठी हजारभर मुलींचे ऑडिशन्स घेण्यात आले होते. या सर्वांमधून अदितीची निवड करण्यात आली. २०१९ मध्ये अदितीने आपल्या करिअरची सुरूवात मराठी मालिका ‘सिंधू’ पासून केली होती. याशिवाय तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे. ‘मेरे साई’ आणि ‘रूप’ या दोन मालिकांमध्येही ती पाहुण्या बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. सध्या अदिती जलतरे १० वर्षांची असून ती मराठी आहे.

See also  महेश मांजरेकर यांनी अभिनेत्री सई मांजरेकर बाबतीत केला मोठा खुलासा, म्हणाले "सलमान खान...

Aditi Jaltare Ahilya Bai Holkar

अहिल्या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, हजारभर मुलींचे ऑडिशन्स म्हणजे काही सोपे काम नव्हे. एक- दोन नाही तर तब्बल आठ महिने ही ऑडिशन्सची प्रक्रिया सुरू होती. ऑडिशन प्रक्रिया खूपच क’ठी’ण होती. मालिकेतील या महत्वाच्या भूमिकेसाठी कलाकारांना अनेक प्रकारच्या, चाळणी प्रक्रिया जसे लु’क टे’स्ट, मॉ’क फो’टो’शू’ट, शॉ’र्ट’लि’स्ट इ. मधून जावं लागलं. या निवडी बद्दल बोलताना मालिकेचे दिग्दर्शक जॅक्सन सेठी म्हणाले की, “अहिल्याबाईची भूमिका मुळातच फार आ’व्हा’ना’त्म’क आहे.

aditi jaltare2

त्यातही एका मुलीसाठी ती विशेष आ’व्हा’ना’त्म’क आहे. यासाठी मुलीत नैसर्गिक निरागसता असणं आवश्यक आहे. तरच ही व्यक्तिरेखा प्रभावी होईल. मला वाटतं की आम्ही जे शोधत होतो ते अदिती जलतरेच्या रूपात आम्हाला मिळालं. या भूमिकेसाठी ती एक उत्तम निवड आहे. अहिल्याबाईंच्या बालपणीच्या पात्रासाठी ती परिपूर्ण आहे.”

See also  'पाहिले न मी तुला' या मालिकेतील प्रमुख अभिनेता आशय कुलकर्णी या कारणांमुळे झाला होता गायब!

jaltare

या मालिकेत अहिल्याबाई होळकर आणि त्यांचे सासरे म’हा’प’रा’क्र’मी मराठा सरदार मल्हारराव होळकर यांच्या माध्यमातून सून आणि सासरे यांच्यातलं मजबूत नातं दाखवलं जाणार आहे. या मालिकेत अहिल्याबाई यांचं संपूर्ण आयुष्य दाखवलं जाणार आहे. यात गावातल्या एका सर्वसामान्य मुलीची थेट मराठा साम्राजाची राणी होण्यापर्यंतची कहाणी दाखवण्यात येईल. मल्हारबाबांची भूमिका राजेश शृंगारपुरे तर पुण्यश्लोक आहिल्याबाईंची भुमीका स्नेहलता वसईकर हे मा’त’ब्ब’र कलाकार साकारणार आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close