मराठमोळ्या श्रेयस तळपदेने चक्क केले “पुष्पा” चित्रपटाचे ङबिंग, आजपर्यंतचे अनेक कटु अनुभव मांडत त्याने केला आपला ङबिंग प्रवास

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

श्रेयस तळपदे हे मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेता श्रेयस तळपदे याला आजपर्यंत आपण अनेक मराठी व हिंदी चित्रपट तसेच मालिकांमध्ये पाहिले आहे. श्रेयस हा मूळचा मुंबईचा. अंधेरीतील श्री राम वेल्फेअर सोसायटीतील हायस्कूलमध्ये त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर विलेपार्ले मधील मिठीबाई महाविद्यालयात त्याने आपले पुढील शिक्षण पूर्ण केले.

“आँखे” या हिंदी चित्रपटांतून श्रेयसने हिंदी चित्रपट सृष्टीत आपलं पहिलं पाऊल टाकले. त्यानंतर त्याने 34 या हिंदी चित्रपटांत काम केले. त्याचप्रमाणे 7 मराठी चित्रपटांत त्याने प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. तर 10 मराठी मालिकांमध्ये काम सुद्धा केले आहे.

त्याचप्रमाणे नुकताच “पुष्पा” हा तेलुगु भाषेतील सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. तर तुम्हांला ठाऊक आहे का, या चित्रपटाच्या हिंदी वर्जनसाठी चक्क आपल्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. याविषयी अधिक माहिती सांगताना श्रेयस म्हणतो की,”मी काही फार काळापासून ङबिंग करतो, असे काही नाही. एकदा असेच खर्चासाठी काही पैसे कमावता येतील, म्हणून सहजच मित्रासोबत जाऊन ङबिंग ऑडिशन देऊन आलो होतो. परंतु तेव्हा काही खास प्रतिसाद मिळाला नव्हता.”

See also  या देशात सात मुलांना जन्म दिल्यावर आईला दिले जाते सुवर्ण पदक, कारण ऐकून थक्क व्हाल!

मात्र याआधी श्रेयस तळपदे याने “द लायन किंग” या चित्रपटाचे देखील ङबिंग केले आहे. तर पुष्पा हा सिनेमाचे ङबिंग करताना खरंच खूप धम्माल आली. त्याचे हे ङबिंग स्वतः अभिनेता अल्लू अर्जुन याने सुद्धा ऐकले आहे. पुष्पा सिनेमा हा मुळातच भन्नाट असल्याने त्यासाठी ङबिंग करताना देखील खूप आनंद झाला. त्याचबरोबर विशेषतः ट्रेलर रिलीज केल्यावरच चाहत्यांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, असे श्रेयस म्हणतो. त्यामुळे निश्चितच सर्वत्र श्रेयसचे खूप कौतुक केले जात आहे.

श्रेयस तळपदे याने आतापर्यंत हिंदीतील गोलमाल रिटर्न्स, ओम शांती ओम, गोलमाल 3, सिंबा यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांत उत्कृष्ट काम केले आहे. तर मराठीतील पछाडलेला, सावरखेङ एक गाव, सनई- चौघङे, पोस्टर बॉईज, बाजी हे त्याचे गाजलेले चित्रपट आहेत. दामिनी, अवंतिका या मराठी मालिकांमध्ये देखील त्याने अतिशय सुंदर भूमिका साकारल्या आहेत. तर सध्या तो झी मराठी वाहिनीवरील “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.

See also  पाठकबाई परत येणार! होणार धमाकेदार एंट्री, साकारणार हि भूमिका, ऐकून थक्क व्हाल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment