“पुष्पा” मधील रश्मिका मंदानाच्या मागे मागे फिरणारा केशव ठाऊक आहे का? एकेकाळी करायचा हे काम

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो हल्ली जिकडे तिकडे आपल्याला “पुष्पा” या चित्रपटाचा जल्लोष ऐकू येत आहे. या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तर सध्या हा चित्रपट बॉक्सऑफिसवर प्रचंड धूमाकळ घालत असून या चित्रपटातील प्रत्येक कलाकार हे चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. तर मित्रांनो या चित्रपटात केशवची भूमिका साकारलेल्या कलाकाराविषयी आम्ही आज तुम्हांला सांगणार आहोत.

पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत आणखी एक भूमिका गाजली, ती म्हणजे केशवची. ही भूमिका अभिनेता जगदीश प्रताप भंडारी याने साकारली आहे. पुष्पाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या केशवने आपल्या अप्रतिम संवाद कौशल्यामुळे सर्व प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे हा कलाकार नेमका कोण आहे बरं…. तो सध्या काय करतो, हे जाणून घेण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक आहेत.

See also  शाहरुख व गौरीच्या घरावर आहे चक्क 'ह्या' व्यक्तीचा ताबा, पाहा बरं ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण...

केशव म्हणजेच अभिनेता जगदीश प्रताप भंडारी याचा जन्म तेलंगणा मध्ये 18 जानेवारी 1993 रोजी झाला आहे. तेलुगु विश्वातील हा एक खूप प्रसिद्ध कलाकार आहे. जगदीश हा सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असतो. त्याचे 13.6 इतके फॉलोअर्स आहेत. अभिनेता जगदीश च्या कुटुंबात आई, वडील आणि दोन बहिणी आहेत. त्याने पोलीस दलात कार्यरत व्हावे, अशी त्याच्या वङिलांची इच्छा होती. मात्र जगदीशला अभिनयात रूची होती.

आपल्या एका मुलाखतीमध्ये त्याने आपल्या करियरविषयी आणि स्वतःच्या कुटुंबाविषयी अनेक खुलासे केले आहेत. जगदीश कलाविश्वात येण्याआधी सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असे. तसेच त्याने चित्रपटगृहात फ्रेंच फ्राइज आणि स्वीट कॉर्न सुद्धा विकले आहेत. परंतु त्यानंतर अतोनात प्रयत्न करून त्याने कसेबसे हैदराबाद गाठले व तेथे प्रसाद स्टुडिओ च्या एका शॉर्ट फिल्म मध्ये त्याला छोटेखानी भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

See also  अभिनेत्री शिवानी बावकर व शिव ठाकरे पडलेत एकमेकांच्या प्रेमात? त्यांचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

2018 मध्ये जगदीशने Mic Tv च्या “निरुद्योग नटुलू” या कार्यक्रमात काम केले. त्यानंतर 2019 मध्ये तो तेलुगु वेबसिरीज “गॉङ ऑफ धर्मापुरी” यामध्ये सुद्धा झळकला. त्यानंतर त्याच्या प्रसिद्धीत अधिकाधिक वाढ होत गेली. पुष्पा या चित्रपटानंतर जगदीशचा लवकरच “पिक पॉकेट” हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येत आहे. 2022 मध्ये त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होईल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  बॉलीवुड इंडस्ट्रीमधील या सुपरहिट अभिनेत्याने आपल्या विद्यार्थीनीसोबतच केले लग्न; यांची लवस्टोरी ऐकून थक्क व्हाल!
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment