“राहुल द्रविड हे माझं पहिलं वहिलं प्रेम आहे”, या बॉलीवुड अभिनेत्रीने केले अखेर कबूल..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

भारतातील क्रिकेट खेळाडूंमधील राहुल द्रविड वर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याची आता वेळ आली आहे. मात्र तरीही त्याचे चाहते त्याच्यावर अजूनही तितकेच भरपूर प्रेम करतात. तुम्हांला ठाऊक आहे का, त्याच्या चाहत्यांच्या लिस्टमध्ये बॉलीवुड अभिनेत्री रिचा चङङा हिचा देखील समावेश आहे. इतकंच नव्हे तर आपलं पहिलं प्रेम राहुल द्रविड आहे, असे सुद्धा रिचा ने स्वतः सांगितले. ती म्हणते की,”मी आता नित्यनेमाने क्रिकेटचे सामने पाहत नाही. परंतु कधीतरी राहुल द्रविड ला पाहण्यासाठी मी माझ्या भावासोबत क्रिकेट नक्की पाहते.”

राहुल द्रविड ने 2012 मध्ये कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. त्याने अखेरचा वनङे सामना 2011 मध्ये खेळला होता. रिचा चङङा म्हणाली, जेव्हा द्रविड क्रिकेट संघातून निवृत्त झाला, तेव्हा तिने क्रिकेट पाहणे बंद केले होते. तर आता राहुल द्रविड ला भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनविण्यात आले आहे.

See also  अभिनेत्री श्रुती हसनने केला मोठा खुलासा, म्हणाली साऊथ इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींसोबत होतात हे अ'न्या'य...

T 20 विश्वचषकानंतर आपले मुख्य प्रशिक्षक पद सोडलेल्या रवी शास्त्रींच्या जागी द्रविडने संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्याचप्रमाणे द्रविड च्या मार्गदर्शनाखाली भारताने हल्लीच T 20 मालिकेत (INDIA Vs ND T 20 ) न्यूझीलंडचा 3-0 पराभव केला.

अभिनेत्री रिचा चङङा हिने सांगितले की, ती लहानपणी क्रिकेटची खूप मोठी फॅन नव्हती. माझा भाऊ क्रिकेट खेळायचा. मात्र एक काळ असा होता की, मी टिव्हीवर तासनतास क्रिकेटचे सामने पाहायची. मला राहुल द्रविडला खेळताना पाहायला खूप आवडायचे. त्यामुळे जेव्हा त्याने क्रिकेट संघातून माघार घेतली, तेव्हा मी क्रिकेट पाहणे बंद केले. राहुल द्रविड ने याआधी जूलै मध्ये भारताच्या मर्यादित षटकांच्या श्रीलंका दौऱ्यात सुद्धा भारताला मार्गदर्शन केले होते.

फलंदाज राहुल द्रविड याने आपले क्रिकेट च्या कारकीर्दीत 164 कसोटी आणि 344 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने दोन्ही फॉरमॅट मध्ये 10 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. द्रविड च्या नावावर कसोटीत 13288 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 10889 धावा आहेत.

See also  राहुल गांधीवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे, नाना पटोले शिवसेनेवर भडकले; जाणून घ्या कारण

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment