‘साथ निभाना साथिया’ मधील गोपी बहू पडलीये या बॉलीवूड सिंगरच्या प्रेमात, बॉयफ्रेंड नाव ऐकून थक्क व्हाल!

“साथ निभाना साथिया” या सीरियल मधील गोपी बहू तर सर्वांची फेवरेट आहे. तिने आपल्या साधेपणाने व सादगीने आपल्या चाहत्यांचे मन जिंकले. प्रत्येक घरातील सासू अगदी गोपी बहू सारखी सून आपल्याला देखील अशी स्वप्न पाहू लागल्या.

आपली ही गोपी बहू ची भूमिका निभावणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य ही बिग बॉस 14 मध्ये एजाज खान घरातून बाहेर पडल्यावर प्रॉक्सी बनून बिग बॉस हाऊस मध्ये आली आहे.

बिग बॉस हाऊस मध्ये आल्यावर तिने गेम मधून सर्वांचेच मन जिंकले. बिग बॉस हाऊस मध्ये आल्यावर प्रत्येकजण आपापल्या पर्सनल लाइफशी संबंधित अनेक किस्से शेयर करतात. अगदी तशीच देवोलिना सुद्धा या लिस्ट मध्ये सहभागी झाली आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला तुमच्या फेवरेट गोपी बहुचे वैयक्तिक किस्से सांगणार आहोत.

देवोलिना भट्टाचार्य ने आपल्या लवलाइफशी संबंधित खुलासा केला आहे. तिने शो मध्ये सांगितले की, मी सिंगल नाही. तिचा एक बॉयफ्रेंड आहे. याच एपिसोड मध्ये राखी सावंत ही राहुल वैद्यच्या आवाजाची स्तुती करते.

त्याच दरम्यान देवोलिना म्हणते की, राहुल हा खूप छान सिंगर आहे. तेव्हा राखीने देवोलिना ला विचारले की, तुला गाणी आवडतात का, तर तिने म्हटले की, हो, मला गाणी खूप आवडतात. माझे गाण्यांवर खूप प्रेम आहे.

तेव्हा अचानक राखी देवोलिना ला विचारते की, तू सिंगल आहेस का? यावर ती मान ङोलावत म्हणते की नाही. ती म्हणते की, माझा पण बॉयफ्रेंड आहे. यावर राखी सावंत टोमणा मारत म्हणते की, “मग त्याचे काय, ज्याच्यासोबत घरी बसून तू गाणी म्हणते.” राखीचा इशारा राहुल वैद्यकङे असतो. यावर देवोलिना म्हणते की, राहुल ची गर्लफ्रेंड आहे आणि माझा बॉयफ्रेंड आहे.

त्यानंतर राखी देवोलिना ला विचारते की, खरं प्रेम रियल मध्ये होतं का? त्यावर देवोलिना भट्टाचार्य म्हणते की, याबद्दल मला जास्त काही माहीती नाही. पण जी व्यक्ती आपली काळजी करते, जेव्हा कुणी आपली रिस्पेक्ट करते, त्याच व्यक्तीवर आपण प्रेम करू लागतो. प्रेम म्हणजे एका सवयीप्रमाणे असते.

यापुढे राखी सावंत देवोलिना ला म्हणते की, “याचा अर्थ सवय तर कुणाचीही लागते”. मग देव राखी ला म्हणते की, तू आता कामदेव सारखा खेळ खेळत आहेस. त्या वेळी राहुल वैद्य तेथे येतो आणि राखी देवोलिना भट्टाचार्य ला चिडवू लागते. यावर दोघीही खूप हसतात. मात्र अजूनही देवोलिना च्या फॅन्स ना तिचा बॉयफ्रेंड कोण आहे, हे माहितच नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment