राज कपूर व दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानातील हवेलींची किंमत काय ठरली, पाक सरकारने घेतला हा मोठा निर्णय…

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज कपूर व दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानातील वडिलोपार्जित हवेल्यांची किंमतीचा तिढा अखेर सरकार पुरता सुटला असून त्या बाबतीत इम्रान खानच्या पाकिस्तानी सरकारने नियमानुसार किंमत ठरविली आहे.

परंतु आजही दिलीपकुमार आणि राज कपूर यांची भारत, पाकिस्तानच नव्हे तर जगभरात असलेली क्रेझ व फॅन फॉलोविंग लक्षात घेता या वारसा वास्तूंचे महत्व आणि बाजार मूल्य हे पाक सरकारने ठरवलेल्या आधारभूत किमतीपेक्षा कितीतरी पटींनी जास्त असल्याचे त्या हवेलींच्या सध्याच्या मालकांचे म्हणणे आहे.

पेशावरमध्ये अशा स्वरूपाच्या १८०० ऐतिहासिक इमारती असून त्यापैकी अनेक इमारती ३०० वर्षे जुन्या आहेत. बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर आणि ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांची पाकिस्तानातील वडिलोपार्जित घरांची खरेदी करण्याचा निर्णय पाकच्या खैबर पख्तनुवा प्रांताच्या सरकारने घेतला असून या घराचे मूल्य निश्चित करण्यात आले आहे.

या दोन्ही अभिनेत्यांच्या वडिलोपार्जित घरांच्या इमारती सध्या अतिशय जीर्ण व मोडकळीस आल्या आहेत. त्या ध्वस्त होण्यापूर्वी खैबर पख्तनुवा सरकारने त्या खरेदी करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. पेशावरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या दोन्ही इमारतींना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सरकारने मोठा निर्णय घेत या दोन्ही घरांचे मूल्य निर्धारित केले आहे. आजतकच्या वृत्तानुसार, दिलीप कुमार यांच्या चार मजली घराची किंमत ८०.५६ लाख रूपये निश्चित करण्यात आली आहे तर राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरासाठी १.५० कोटी रूपये इतकी किंमत निर्धारित करण्यात आली आहे. कम्युनिकेशन अँड वर्क्स डिपार्टमेंटने दिलेल्या अहवालानंतर पेशावरचे उपायुक्त मोहम्मद अली असगर यांनी दोन्ही घरांचे मूल्य निर्धारित केले आहे.

फाळणीपूर्वी पाकिस्तानच्या याच घरांमध्ये राज कपूर आणि दिलीप कुमार या ख्यातनाम अभिनेत्यांचा जन्म झाला होता.  राज कपूर यांचे वडिलोपार्जित घर हे पेशावरच्या किस्सा खवानी बाजारात आहे. हे घर राज कपूर यांचे आजोबा दीवान बासेश्वरनाथ कपूर यांनी उभारले होते. राज कपूर यांनी त्यांचे बालपण याच घरात घालवले होते. त्याचा सध्याचा मालक अली कादर मात्र या वास्तूचे सध्याचे बाजारमूल्य २०० कोटी रु. सांगत आहे.

दिलीप कुमार ज्या घरात जन्मले, त्या घराची १०० वर्षे जुनी वास्तूही याच परिसरात आहे. २०१४ साली नवाज शरीफ यांच्या सरकारने हे घर राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले होते. त्याचे ही बाजारमूल्य सरकारी किमतीपेक्षा कितीतरी अधिक असल्याने तो मालकही किंमत जास्त सांगतो आहे.

योग्य किंमत न मिळाल्यास या इमारती पाडून त्या ठिकाणी शॉपिंग मॉल बांधण्याची तयारी या मालकांनी चालविली असून, आम्ही तसे काही घडू देणार नाही असे इम्रान खान सरकार म्हणत आहे. बघू यात पुढे काय होते ते…..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment