अभिनेत्री शिल्पा शेट्टीसाठी राज कुंद्राने सोडले होते आपल्या पहिल्या पत्नीला, पण नंतर त्यांच्या पहिल्या पत्नीने…

मित्रांनो आणि मैत्रीणींनो तुम्ही असे कपल्स पाहिले आहेत का बरं, ज्यांनी आपल्या प्रेमासाठी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. सारं जग एका बाजूला आणि आपलं प्रेम हे दुसर्‍या बाजूला. प्रेम हे आंधळं असतं, शेवटी हेच खरं. बॉलीवुड इंडस्ट्री मधील अनेक लव्हस्टोरीज आपण ऐकतो. परंतु काही स्टार्सचे अफेअरस् हे खूप वेगळे असतात. आपण सर्वसामान्य लोक ज्या गोष्टींचा विचार करत नाही, ते सर्व हे सुपरस्टार लोक बिनधास्तपणे करतात. असे आपल्याला दिसते.

“धङकन” या चित्रपटातून आपल्या मोहक सौंदर्याने आणि सालस अशा स्वभावाने चाहत्यांच्या हृदयावर जादू जिने अफलातून जादू केली. अशी अभिनेत्री जी इंडस्ट्रीमध्ये योगा क्वीन म्हणून प्रसिद्ध आहे. अगदी बरोबर ओळखलंत तुम्ही, स्लिम- ङ्रिम, फिटनेसची सौंदर्यवती अभिनेत्री शिल्पा शेट्टी. आज आम्ही तुम्हांला या अभिनेत्रीची स्वीट परंतु जास्त क्यूट अशी सुपरङुपरहिट लव्हस्टोरी सांगणार आहोत. जी तुम्हांला देखील नक्कीच आवडेल.

article 20151132415533157211000

शिल्पा शेट्टी या अभिनेत्रीने बॉलीवुड मध्ये अनेक चित्रपटांत काम केले. तिचे काही चित्रपट हिट झाले तर काही चित्रपट प्लॉप झाले. ती आपल्या करियरमध्ये भले ही अपयशी ठरली, परंतु तुम्हांला माहित आहे का? शिल्पाने आपल्या वैयक्तिक आयुष्यात अगदी स्वर्गासारखे सुख मिळवले आहे. जसे की प्रत्येक मूलीचं आपल्या आयुष्यात एक सुंदर स्वप्न असतं. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा असा जोडीदार हा प्रत्येक मूलीला हवा असतो.

शिल्पा शेट्टीने 2009 मध्ये राज कुंद्रा या पॉप्युलर बिजनेसमैन सोबत लग्न केले. यांच्या लग्नाला तब्बल 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही हे कपल आतापर्यंत एकमेकांवर खूप खूप प्रेम करतात.

main qimg 315cb142d30228c574cdd9eabaec1bab

शिल्पा व राज यांची पहिली भेट कशी बरं झाली? शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा या दोघांची पहिली भेट ही लंडनमध्ये झाली होती. अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही बिग ब्रदर हा रियालिटी शो 2007 मध्ये जिंकल्यानंतर लंडन मध्ये खूप फेमस झाली होती. तर राज कुंद्रा हे देखील बिजनेस मधील एक प्रसिद्ध आणि नावाजलेले व्यक्तिमत्त्व होते. शिल्पा च्या एका परफ्यूम ब्रँड एस- 2 च्या दरम्यान शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची पहिलीवहिली भेट झाली.

राज यांनी शिल्पाला या ब्रँड च्या प्रमोशनसाठी खूप मदत केली होती. त्यामुळे आपली ही क्यूट क्वीन राज वर अगदी मनापासून इम्प्रेस झाली होती. त्यानंतर मग यांचे एकमेकांना भेटले दिवसेंदिवस वाढत गेले, आणि हे दोघेही केव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले. हे यांचे यांना देखील समजले नाही. शिल्पा व राज हे एकमेकांसोबत एकत्रितपणे बरेच ठिकाणी दिसले आहेत.

shilpa raj d f

त्यानंतर शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा हे 2009 मध्ये एकमेकांसोबत विवाहबद्ध झाले. परंतु तुम्हांला माहित आहे का? शिल्पा ही राज यांची पहिली नव्हे, तर दुसरी पत्नी आहे. राज कुंद्रा यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कविता असे आहे. कविता आणि राज कुंद्रा यांना एक मुलगीही आहे. परंतु कविता सोबत राजचे वैवाहिक नाते हे जास्त काळ टिकू शकले नाही.

शिल्पाची एन्ट्री राज च्या आयुष्यात झाल्यानंतर राज व कविता यांचा घटस्फोट झाला. तेव्हा राज यांच्या पहिल्या पत्नीने अभिनेत्री शिल्पा शेट्टी वर खूप गंभीर आरोप केले होते. कविताचे मत होते की, तिचे सुंदर घर उजाङण्यामागे फक्त आणि फक्त शिल्पा शेट्टी हीच एकमेव जबाबदार आहे.

shilpa shetty raj kundra 759

कविता यांनी सांगितले की, “शिल्पाच्या प्रेमात आंधळे होऊन राजने त्यांना व त्यांच्या नुकत्याच जन्मलेल्या मूलीला सोडून दिले होते. त्यांनी तर हे देखील सांगितले की, शिल्पा शेट्टी ही भारतीय समाजासाठी एक आदर्श आहे, असे वाटते. परंतु ती जशी दिसते, तशी ती प्रत्यक्षात मुळीच नाही. तिला लग्नासाठी अजून कुणीही भेटले असते. या जगात लाखो लोक सिंगल आहेत. परंतु तिने माझ्या नवर्‍यावर नजर ठेवण्याची काहीही गरज नव्हती.”

तुम्हांला माहित आहे का, राज कुंद्रा यांची पत्नी कविता जेव्हा गरोदर होत्या. तेव्हाच राज यांनी शिल्पाला ङेट करण्यास सुरुवात केली होती. पहिली पत्नी कविता यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर तीन वर्षांनंतर राज यांनी शिल्पा शेट्टी सोबत लग्न केले. आज राज व शिल्पा हे दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत. या सुंदर कपलचा 6 वर्षांचा वियान हा एक मुलगा आहे. तर 9 महिन्यांची छोटीशी क्यूट समीशा ही एक मुलगी देखील आहे. 2020 मध्येच सरोगेसी च्या मदतीने अभिनेत्री शिल्पा शेट्टी एका मुलीची आई बनली आहे.

Kavita Kundra and Raj Kundra

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment