राज कुंद्राने १२ वर्षांनंतर केला खुलासा, म्हणाला, “शिल्पावर आरोप लावण्यासाठी माझ्या पहिल्या बायकोने”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

‘सि’क्रे’ट’ समोर आले की सगळ्यांचीच बोलती बंद होते. परंतु सत्य समोर आले की कितीही वर्षांपूर्वीचा मामला असला तरी त्याचे पितळ उघड पडते. असाच एक किस्सा सध्या बॉलीवुडच्या मायानगरीत घडला आहे. त्याचे झाले असे की, मागील काही दिवसांपूर्वी राज कुंद्रा यांची एक्स वाईफ कविता हिचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये कविता ही शिल्पा शेट्टी वर राज व आपले लग्न तोडल्याचा आरोप करते. तर आता 12 वर्षांनंतर राज कुंद्रा यांनी कविताने शिल्पा वर लावलेल्या आरोपांविषयी मौन सोडले आहे. तसेच त्यांनी आपली पहिली पत्नी कविता हिच्यासोबत च्या घटस्फोटाविषयी स्पष्टीकरण दिले आहे.

राज कुंद्रा ने आपल्या मुलाखतीत सांगितले की, ही खरंच खूप वाईट गोष्ट आहे. माझी पत्नी शिल्पा हिच्या वाढदिवसाच्या काही दिवसांनंतर 11 वर्षांपूर्वीचा हा जुना व्हिडिओ आहे. जो एका जुन्या कहानी ला ताजे करत आहे आणि आमची इमेज खराब करत आहे. मी 12 वर्षांपर्यंत शांत राहीलो, परंतु आता मात्र खूप अती होत आहे.

See also  कोट्यावधींची मालमत्ता असूनही हे बॉलिवूड कलाकार राहतात चक्क भाड्याच्या घरात, 3 नंबरची अभिनेत्री तर...

कारण मला आता भयंकर राग येत आहे. शिल्पा मला या व्हिडिओ कडे दुर्लक्ष करायला सांगत होती. परंतु मला आता असे वाटते की खरं सत्य समोर येण्याची वेळ आली आहे. राजने कविता वर आरोप करत म्हटले की,”तिला हा इंटरव्ह्यू करण्यासाठी खूप पैसे मिळाले होते. आमच्या घटस्फोटावेळी तिने जणूकाही स्वतःचा आत्मा विकला होता. तिला आपले बँक स्टेटमेंट दाखवायचे होते. या गोष्टीचा तिने स्पष्टपणे उल्लेख केला होता की, तिला एका न्यूजपेपर ची स्टोरी कव्हर करण्यासाठी पैसे देण्यात आले होते.”

ती एका सेलिब्रिटी वर स्वतःचे घर तुटल्याचा आरोप करत होती. खरंतर या सर्वासाठी तीच जबाबदार होती. राज ने कविता वर अफेयर असल्याचा आरोप सुद्धा लावला होता. त्याचे म्हणणे होते की, जेव्हा कविता लंडनमध्ये होती, तेव्हा तिचे आपल्याच बहिणीच्या पतीसोबत अफेयर होते.

See also  नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर पुन्हा एक नवीन आरोप, म्हणाले, "वानखेडे हे तर मोदींच्या..."

तसेच राज ने सांगितले की, “ती माझ्या एक्स ब्रदर इन लॉ च्या खूप जवळ आली होती. जेव्हा मी बाहेर असायचो, तेव्हा त्याच्यासोबत ती खूप जास्त टाइम स्पेन्ङ करायची. माझी फॅमिली आणि माझा ङ्रायव्हर यांचे म्हणणे होते की त्या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे. त्यामुळे माझा तिच्यावर विश्वास नव्हता.” मी माझा परिवार आणि तिचा परिवार एकच समजायचो. त्यामुळे मी कधीही तिच्या फॅमिलीला अंतर दिले नाही. आजदेखील मी परिवाराचे सगळे नियम फॉलो करतो.

राज कुंद्रा यांना आपल्या पत्नी च्या अफेयर विषयी अगोदरपासून माहीत होते. त्यांनी सांगितले की आम्हांला मूलगी झाल्यावर जेव्हा मी कविताला भारतात पुन्हा तिच्या माहेरी सोडवले आणि मी पुन्हा युकेला जाण्यासाठी निघालो. तेव्हा मी तिला मेसेज करून सांगितले की मला तुझ्या अफेयर विषयी माहीत आहे. त्यादरम्यान मला माझ्या 40 दिवसांच्या मूलीला सोडून यावेसे वाटत नव्हते.

त्यानंतर मी एका कॉमन फ्रेंङ सोबत शिल्पाला भेटलो व तेव्हा आमची ओळख झाली. कविताला हे सर्व ऑनलाईन मधून समजले. त्यानंतर तिने शिल्पा वर आपला संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. घटस्फोटाच्या एग्रीमेंटचे तिने माझ्याकडून करोङो रूपये घेतले. त्याचसोबत मला माझ्या मुलीपासून पण दूर राहायला सांगितले.

See also  अभिनेत्री राखी सावंत आहे तब्बल एवढ्या संपत्तीची मालकीण, रक्कम ऐकून डोळे पांढरे होतील...

राज कुंद्रा ने कविता सोबत 2003 मध्ये लग्न केले होते. त्यानंतर 2006 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर काही दिवसांनी राज कुंद्रा यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोबत लग्न केले. त्या दोघांना आता विहान हा एक मुलगा आणि समीशा ही मूलगी आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment