खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय, जाणून घ्या राज ठाकरे असं का म्हणाले?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

पुणे: दोन दिवसांपूर्वी ईडीने ने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची 9 तास कसून चौकशी केली होती. एकनाथ खडसे यांचा सूड घेण्यासाठी भाजपने रचलेले कारस्थान आहे, असे आरोप करण्यात येत आहेत. भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केल्यापासूनच त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.(ED Questions NCP Leader Eknath Khadse)

1625997911826

ED च्या गैरवापराबद्दल राज ठाकरेंचे उत्तर…

सध्या केंद्र सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव आणण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले की, “मी एकनाथ खडसे यांच्या सीडीची वाट पाहत आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर नेहमीच होत आला आहे. कॉंग्रेसनेही त्यांचा गैरवापर केला आणि आता भाजपही तेच करत आहे.”

See also  स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेकरीता अमोल कोल्हेंनी खरचं त्यांच घर विकलं होतं का?

भाजपसोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी सीडी बाबत वक्तव्य केलं होतं. त्यांनी (भाजपने) माझ्यामागे ईडी लावली तर मी माझ्याकडे असलेली CD लावतो. असं एकनाथ खडसे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांच्या सीडीची वाट पाहत आहे. असं वक्तव्य केलं आहे.

सरकारी यंत्रणा काय तुमच्या हातातील बाहुली आहे का ?

सरकारी यंत्रणा काय तुमच्या हातातील बाहुली आहे का? या यंत्रणांचा चुकीचा वापर करणे चालणार नाही. ज्यांनी गुन्हे केलेत ते मोकाट फिरत आहेत आणि इतरांवर राजकीय सूड घेण्यासाठी कारवाई होत आहे. हे चुकीचं असल्याचं राज ठाकरे म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

राज ठाकरेंची ही झाली होती ED कडून चौकशी

See also  दिलासदायक: ‘या’ भागात वीजबिल वसूल न करण्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांचे आदेश

ऑगस्ट 2019 मध्ये राज ठाकरे यांचीही ED कडून चौकशी झाली होती. त्यावेळी राज ठाकरे यांना गप्प करण्यासाठी भाजपने असं केल्याचा आरोप होत होतं. मात्र, राज ठाकरे यांनी कितीही चौकश्या झाल्या तरी गप्प बसणार नाही, असं वक्तव्य केलं होतं.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment