मराठा, ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राज ठाकरेंनी विचारला ‘हा’ प्रश्न, सर्वपक्षीय नेत्यांचा घेतला समाचार

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

पुणे: मागील काही काळापासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षण विषयावर राजकारण शिगेला पोहोचले असून, सरकार आणि विरोधी पक्षांतील नेत्यांचे एकमेकावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

images 1540202108659 Raj Thackeray2
File Photo

सर्वांना मान्य तर अडलं कुठे?

Advertisement

“ मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण सर्वांना मान्य आहेत तर नेमकं अडलं कुठे? आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून फक्त राजकारण करायचे आहे का?” असा प्रश्न त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केला आहे.

मनसे शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी ते पुण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांचा समाचार घेतला. मराठा आरक्षण मोर्चे निघाले तेव्हा कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना पक्षांच्या नेत्यांनी मोर्चेकरांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वांना आरक्षण मान्य होतं. जर सर्वांना आरक्षण मान्य आहे तर अडतय कुठे? फक्त आरक्षण विषयाचा इश्यू करून मराठा तरुणांची माथी भडकवायची आहेत का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

See also  महागाई मुद्द्यावर 'या' दिग्गज नेत्याची मोदी सरकारवर जोरदार टीका, म्हणाले...
Advertisement

ओबीसी आरक्षणाबाबतही असेच आहे. सर्वपक्षीय नेत्यांना ओबीसी आरक्षण मान्य आहे. मग कोर्टात आरक्षणाची बाजू व्यवस्थित का मांडली जात नाही? या सर्व नेत्यांना एका व्यासपीठावर आणून यांना याबाबत विचारलं पाहिजे. असं राज ठाकरे म्हणाले.

सध्या सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेले आरक्षण रद्द केले असून, आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यापेक्षा जास्त वाढवण्याचा राज्याचा अधिकार नाही. असंही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

Advertisement

Leave a Comment

close