राज ठाकरे मला ‘त्या’ व्हिडिओंच्या लिंक पाठवणार आहेत: चंद्रकांत पाटील

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

नाशिक: काल 17 जुलै रोजी पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी नाशिक दौर्‍यावर असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी योग जुळला तर राज ठाकरे यांना जरूर भेटेन असं वक्तव्य केलं होतं. योगायोगाने आज तो योज जुळला आणि राज ठाकरे व चंद्रकांत पाटील यांची सकाळी भेट झाली.

राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज ठाकरे यांच्यासोबत माझी 15 मिनिटं चर्चा झाली. आम्ही काही फक्त हवा-पाण्याच्या गोष्टी केल्या नाहीत. तर राज ठाकरे यांनी मला सांगितलं की त्यांच्या परप्रांतीय विषयीच्या भाषणांचा विपर्यास झाला. ते मला त्या भाषणांच्या व्हिडिओंची लिंक पाठवणार आहेत.

See also  राहुल गांधीवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे, नाना पटोले शिवसेनेवर भडकले; जाणून घ्या कारण

राज ठाकरेसोबत युती बाबत चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठं नेतृत्व आहे. राज ठाकरे यांच्याबाबत भाजपची कोअर समिती निर्णय घेईल, अशी माहिती त्यांनी दिली.

काल नाशिकमध्ये चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, जर राज ठाकरे यांनी परप्रांतीयाविरोधात असलेले मनसेचे धोरण बदलले तरच युती शक्य आहे. त्यांच्या या वक्तव्याला एक दिवस लोटत नाही, तोच राज ठाकरे यांनी त्यांच्या परप्रांतीयाविषयीच्या भाषणाचा विपर्यास करण्यात आला असल्याचे चंद्रकांतदादा यांना सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना ऊत आला आले.

राज ठाकरे यांनी 2019 लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात रणशिंग फुंकले होते. त्यांनी राज्यभरात अनेक सभा घेऊन भाजपविरोधात प्रचार केला होता. राज ठाकरे यांचा पक्ष मनसे आणि भाजपमध्ये येणार्‍या काळात जर युती झाली तर राज्यातील समीकरण बदलू शकते असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

See also  आई झाल्यावर "या" महिला खासदारने केले आपल्या प्रियकरासोबत गुपचूप लग्न?
Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment