स्वतः राज ठाकरे साहेबांनी लवकरच येणाऱ्या या मराठी मालिकेसाठी, मराठीतील “या” सुपरहिट जोडीला दिल्या शुभेच्छा

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या एकतर लॉक डाऊन आणि टेलिव्हिजनवरील त्याच त्या रटाळ आणि भंपक मालिकांना कंटाळला असाल तर तुमच्यासाठी येतेय एक चांगली बातमी. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे, आपल्या सर्वांचाच अत्यंत लाडका आणि लोकप्रिय विनोदी अभिनेता भरत जाधव याच्यासह दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रविवार दि. २५ ऑक्टोबर पासून घेऊन येत आहे, कलर्स मराठीवर एक नवी कोरी मराठी मालिका, “सुखी माणसाचा सदरा”. केदार शिंदेच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ या नव्या मालिकेचे राज ठाकरे यांनीही भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.

“सुखी माणसाचा सदरा’ आणेल लोकांच्या चेहऱ्यावर हास्य’, राज ठाकरेंनी भरत जाधवसाठी केलं ‘हे’ ट्विट…

Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्य आणि कला प्रेम या बद्दल आपण सर्वजण जाणून आहातच. अनेकदा मराठी सिनेमा आणि नाटकांबद्दल ते मनमोकळेपणाने आपली रोखठोक आणि परखड मते मांडत असतातच. मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये मध्ये आपल्या मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळत नव्हता तेव्हा प्रत्येकवेळी आधी मनसेनं आवाज उठवला होता.

See also  लहान मुलांसाठीचे कोरोना लसीकरण 'या' महिन्यापासून सुरू होऊ शकते, जाणून घ्या पूर्ण माहिती

मराठी असो वा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री अनेक सुपरस्टार कलाकारांशी राज ठाकरे साहेबांचे चांगले संबंध आहेत. मागे सुप्रसिडध मराठी अभिनेता सुबोध भावे ‘आणि त्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाचे त्यांनी कौतुक केले होते. त्यानंतर आज पुन्हा दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता भरत जाधवच्या या नव्या मालिकेचे राज ठाकरे यांनी भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement


विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी दिग्दर्शक केदार शिंदे यांची नवी मालिका ‘सुखी माणसाचा सदरा’ चा प्रोमो शेअर करतच त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, ही मालिका लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

See also  राज कुंद्रा प्रकरणावर ‘शक्तिमान’ने दिली धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाले शिल्पा शेट्टीला 120%...

मालिकेबद्दल बोलताना आपल्या ट्विटमध्ये राजसाहेब म्हणाले की, ‘कोरोनाचे सावट आणि त्यामुळे आलेलं आर्थिक संकट यामुळे सगळ्यांचाच आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दुरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडू दे, असे मनापासून वाटते आहे.

Advertisement

तसेच “सुखी माणसाचा सदरा” मालिकेतून बराच काळ रसिक प्रेक्षकांपासून दूर राहिलेला अभिनेता भरत जाधव परत एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. याबद्दल सुद्धा राज ठाकरे यांनी ट्विट केलंय. त्यामध्ये ते म्हणताहेत की, ‘भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर आलेले पाहून छान वाटले. या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावरणात तुमचा ‘सुखी माणसाचा सदरा’ रोज किमान अर्धा तासतरी मराठी मनांना या अनिश्चितेतून ब्रेक देईल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल आणि त्या आनंदात येणाऱ्या दिवसाला सामोरे जाण्याची ताकद मिळेल. हे केदार व भरत तुम्ही नक्की पाहा.’

See also  निर्मात्यांपुढे मराठी चित्रपटनिर्मितीचा मोठा प्रश्न- अक्षय बर्दापूरकर

अशा पद्धतीने राज ठाकरे यांनी केदार शिंदे आणि भरत जाधव यांच्यासह “सुखी माणसाचा सदरा” या मालिकेच्या सर्व टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close