‘राजा राणीची जोडी’ मधील सुजित ढाले पाटलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्या बद्दल जाणून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मनोरंजन क्षेत्रातील काम करणारे कलाकार यांच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय ? ते कुठे राहतात ? आणि महत्वाच म्हणजे रोजचं जगणं कसं जगतात ? या अनेक गोष्टी जाणून घेण्याची सर्वसामान्य कलाकार म्हणून खूप हौस असते. कारण त्यांचे लाखो चाहते असतात. त्यांच्याकडे फार ग्लॅमर असतं. आणि याच ग्लॅमर मुळे ते खूप चर्चेत असतात.

143243372 219736339853062 2831799984568424132 n 1

Advertisement

मराठी मालिका सध्या खूप आघाडीवर आहेत. म्हणजे त्यात खूप अश्या मालिका आहेत की ज्या सध्या टीआरपीच्या बाबत खूप लोकप्रिय आहेत. त्यातली काम करणारी कलाकार सुद्धा प्रसिद्ध आहेत. राजा राणीची ग जोडी ही कलर्स मराठी वाहिनीवर लागते. तर त्यातला विषय आणि कलाकार यांचं मिश्रण मिळून आल्याने मालिका लोकांना खूप आवडू लागलेली आहे. त्यातला एक कलाकार कोण आहे ? हे आपण आज जाणुन घेणार आहोत.

कलर्स मराठीवरील “राजा राणी ची गं जोडी ” या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत सुजित ढाले पाटील हे पात्र देखील प्रेक्षकांना खूपच भावले असून या पात्राला लवकरच येऊ घातलेल्या कलर्स मराठी अवॉर्डमध्ये लोकप्रिय भावंड आणि लोकप्रिय प्रमुख व्यक्तिरेखा अशी दोन नामांकन मिळाली आहेत. आज सुजित ढाले पाटील ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

See also  'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील ही प्रसिद्ध अभिनेत्री सध्या काय करते माहितेय? जाणून थक्क व्हाल!
Advertisement

146882694 489839859084048 1920192535109838218 n

ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव आहे “पार्थ घाटगे”. तो मूळचा सांगली चा आहे. त्याला नाटकाची खूप आवड होती. म्हणजे अजूनही आहे. त्याने काही नाटकं आणि एकांकिका केलेल्या आहेत. आणि त्यात चांगल्या चांगल्या भूमिका ही. त्यामुळे इथं टेलिव्हिजन वर काम करण्यासाठी त्याला खूप मजा येतेय. आणि तो उत्तम काम ही करतोयच.

Advertisement

पार्थ घाटगे याने या मालिकेअगोदर जाडूबाई जोरात, गणपती बाप्पा मोरया, श्रावणबाळ रॉकस्टार, ड्राय डे, लग्न मुबारक अशा मालिका तसेच चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. लिखाणाची अतिशय आवड असलेल्या पार्थने सबकाँशिअस आणि एक सेल्फी आभाळाचा या लघुपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात संबळ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला त्यात प्रमुख नायकाची भूमिका पार्थने साकारली होती.

See also  नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे आहेत एकमेकांचे जिगरी यार, "या" किस्स्यामुळे झाली होती त्यांच्यात मैत्री...

120299

Advertisement

कोणत्याही कलाकाराला कलाकार म्हणून कोणतीही पार्श्वभूमी लागतेच. तसं पार्थ चं कुटुंब कला क्षेत्रातील चं आहे. त्यामुळे त्याला अभिनयाची गोडी ही लहानपणी पासूनच होती. पुढे चालून याचं त्याने अभिनेता व्हायचं या स्वप्नात रूपांतर केलं आणि आज तो खूप उत्तम काम करत आहे.

पार्थ घाटगे हा प्रसिद्ध निर्माते “अण्णासाहेब घाटगे” यांचा नातू आहे. पंढरीची वारी या गाजलेल्या चित्रपटाची जबाबदारी अण्णासाहेब घाटगे यांनी अतिशय सुरेख बजावली होती हे त्या चित्रपटाच्या लोकप्रियतेवरूनच तुमच्या लक्षात येईल. नणंद भावजय, पाटलीण अशा आणखी दर्जेदार चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती.

Advertisement

voot a0b3f959f47af58e5a7f5cd8adbebfb9

तर पार्थचे वडील निशांत घाटगे हे देखील निर्माते, नाट्यसंयोजक आणि निर्मिती व्यवस्थापक म्हणून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. काही वर्षांपूर्वी नाट्य रसिकांसाठी त्यानी ‘चैतन्य रसिक कला मंच ‘ ही संस्था उभारली होती. आजोबा आणि वडिलांकडून मिळालेला कलेचा हा वारसा पार्थने जपला असला तरी अभिनयात तो सरस ठरलेला पाहायला मिळतो.

See also  "येऊ कशी तशी मी नांदायला” या प्रसिद्ध मालिकेतील कलाकारांची खरी नावे आणि रंजक किस्से ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

तर अश्या प्रकारे उत्तम काम करणाऱ्या पार्थ घाडगे ला पुढे अजून काही मालिका मिळो आणि सिनेमे मिळो त्याचं काम जगात गाजू अश्या त्याला स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा. कारण कुणाचं काम कधी डंका वाजवेल हे कुणीच काहीच नाही सांगू शकत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close