बायको डिंपलच्या भांडणाला कंटाळून राजेश खन्ना करणार होते आ’त्म’ह’त्या, त्यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!
बॉलिवूड मधील एक असं दिगग्ज नाव. अभिनेता म्हणून त्यांनी जी संपत्ती कमवली. ती आजपर्यंत कुणी नसेल मिळवली. प्रचंड प्रसिद्धी मिळालेला अभिनेता बॉलिवूड ने दिला. तर आज त्या अभिनेत्याच्या आयुष्यात घडून गेलेल्या काही गोष्टी वर आपण नजर टाकणार आहोत. ज्या आपल्याला माहीत नसतील. पण त्याआधी जाणून घेऊ की तो लोकप्रिय अभिनेता कोण ? तर राजेश खन्ना. हे.
बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना यांनी जी लोकप्रियता अनुभवली ती क्वचितच दुसऱ्या अभिनेत्याच्या वाट्याला आली असेल. चाहते त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत असत. मुली तर राजेश यांच्या नावाचं कुंकू लावत असत. राजेश खन्ना आणि हिट चित्रपट हे जणू एक समीकरण झालं होतं. अनेक हिट चित्रपट देऊन राजेश खन्ना यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचले होते. परंतु, त्यांची लोकप्रियता ज्या वेगाने पसरली त्याच वेगाने ती कमीही झाली. सगळ्यांना धक्का तर तेव्हा बसला जेव्हा राजेश यांनी त्यांच्यापेक्षा १५ वर्ष लहान असलेल्या डिंपल कपाडियासोबत लग्न केलं.
वयापेक्षा लहान मुलीसोबत लग्न केल्याने त्याकाळी राजेश खन्ना खूप चर्चेत आले होते. पण राजेश खन्ना आणि डिंपल यांचं एकमेकांनवर खूप प्रेम होतं. म्हणून त्यांनी कुणालाही म्हणजे चर्चेला आणि विरोधाला न जुमानता लक्ष न देता लग्न करून संसार सुरू केला. पण तोही अर्धवटच राहिला.
सुप्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांच्या आयुष्यावर राजेश खन्ना: द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज फर्स्ट सुपरस्टार’ हे पुस्तक लिहिणारे यासिर उस्मान यांनी त्यांच्या पुस्तकात काकांच्या जीवनातल्या त्या गोष्टींच्या उलगडा केला आहे ज्या त्यांचे मोठे चाहते म्हणवून घेणाऱ्या व्यक्तींना देखील माहित नसतील. यासिर यांनी डिंपल आणि राजेश यांच्या नात्याबद्दलही अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
राजेश आणि डिंपल यांचं नातं सुरुवातीला खूप चांगलं होतं. परंतु, काही काळानंतर त्यांच्यात खटके उडू लागले. डिंपल एक बिनधास्त अभिनेत्री होती. हळूहळू गोष्टी बदलत गेल्या. त्यांच्यातील वा’द इतके टोकाला पोहोचले होते की डिंपल अनेकदा राजेश यांचा आशीर्वाद बंगला सोडून गेली होती. राजेश यांच्यासोबत बिघडलेल्या नात्यामुळेच डिंपल तिच्या वडिलांच्या घरी गेली.
वा’द हे प्रत्येकाच्या आयुष्यात होतच असतात. नवरा बायको म्हणलं की घरोघरी चुली सारख्या अश्यातली गोष्ट आहे. त्यामुळे वा’द होणारच. तसेच राजेश खन्ना आणि डिंपल यांच्यामध्ये झाले आणि ते दोघेही विभक्त झाले.
राजेश यांच्यापासून दूर जाताना डिंपल ट्विंकलला देखील सोबत नेत असे आणि राजेश यांच्यासोबत बोलतही नसे. या सगळ्या घटनांमुळे डिंपलने राजेश यांच्यापासून वेगळं होण्याचं ठरवलं होतं. तिने घटस्फोटाचे कागदही तयार करून घेतले होते. पण त्या कागदावर सही होऊ शकली नाही कारण राजेश तेव्हा चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी काश्मीरला होते.
ते परत येईपर्यंत डिंपलचे विचार बदलले होते आणि ती पुन्हा राजेश यांच्या सोबत राहण्यासाठी आली. एक वेळ अशी होती जेव्हा राजेश त्यांच्या मनातील कोणतीही गोष्ट डिंपलसोबत शेअर करत नसत. ते मनातल्या मनात कुढत राहत आणि आ’त्म’ह’त्या करण्याचा विचार करत बसत. एका मुलाखतीत त्यांनी ही गोष्टीदेखील मान्य केली होती की, राजेश यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर कधीही मोकळेपणाने भाष्य केलं नाही.
छोट्या छोट्या गोष्टी मुळे भांडण किती ही होऊद्या पण जे भांडतात त्याचंच खरं एकमेकांनवर प्रेम असतं. आणि तस राजेश खन्ना आणि डिंपल मध्ये ही होतं. म्हणून ते एकमेकांना खूप जीव लावायचे. तर असे आहेत काही किस्से जे पुढच्या वेळी जाणून घेऊ. वाचत रहा स्टार मराठी.