राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर कमी, पण निर्बंधात सूट मिळेल की नाही? वाचा आरोग्यमंत्री काय म्हणाले…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मुंबई: देशात सुरू असलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी होताना दिसत आहे. देशभरात कोरोना रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णवाढीचा दर फार कमी असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. मात्र, रुग्णवाढ कमी होत असली तरी राज्यात सुरू असलेले कोरोना निर्बंध असेच सुरू राहतील आणि त्यात सध्या कोणतीही सूट देण्याचा निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

1 लाखापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण…

Advertisement

गेल्या महिन्याभरापासून राज्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या दरदिवशी 7 ते 9 हजारांच्या दरम्यान आहे. देशातील कोरोना रुग्णवाढीच्या तुलनेत हा फार कमी आहे.  सध्या राज्यभरात 1 लाख 4 हजारपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी 92 टक्के रुग्ण फक्त दहा जिल्ह्यात आहेत. इतर 26 जिल्ह्यात फक्त 8 टक्के रुग्ण आहेत.

See also  महाराष्ट्राला दरमहा कोरोना लसीच्या तब्बल ‘एवढ्या’ कोटी डोसची आवश्यकता, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

तिसर्‍या लाटेच्या भीतीने निर्बंधात सूट नाही…

Advertisement

कोरोना विषाणूचे सतत उत्परिवर्तन होत असल्याने सध्या निर्बंधात सूट देता येणार नाही. अनेक तज्ञांनी भारतात तिसरी लाट लवकरच येण्याची चिंता व्यक्त केली आहे. जगभरात अनेक ठिकाणी तिसरी लाट पाहायला मिळाली आहे. यूके, स्पेन, इंडोनेशिया या देशात तिसरी लाट प्रकर्षाने दिसत आहे.

राज्यातील 60 टक्क्यांपेक्षा जास्त जनतेचे लसीकरण करण्याचे सरकारचे ध्येय असून ते लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाल्यावरच निर्बंध शिथिल करता येऊ शकतील असंही ते म्हणाले.

Advertisement

Leave a Comment

close