फँड्री फेम अभिनेत्री राजेश्वरीचा पारा चढला, ट्रोलर्सची केली बोलती बंद, म्हणाली, “मर्दानगी मुलीच्या कमेंट बॉक्समध्ये…”
मित्रांनो आपल्या बॉलीवुड व मराठी सिनेसृष्टीत कधी कुणाला धारेवर धरले जाईल, हे काही सांगितले जाऊ शकत नाही. त्यामुळेच तर बहुतेक वेळेला सेलिब्रिटीजना अतिशय विचारपूर्वक व सावधगिरीने वागावे लागते. अन्यथा त्यांना जबरदस्त वाईट परिणाम अनुभवावे लागतात. असेच काहीसे या अभिनेत्रीच्या बाबतीत देखील घडले आहे.
फँङ्री या चित्रपटातील अभिनेत्री राजेश्वरी खरात हिला सध्या सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात ट्रोल केले जात आहे. त्याचे झाले असे की, राजेश्वरीने आपल्या फेसबुक अकाउंटवर “गिला गिला…” या गाण्यावरील ङान्सचा व्हिडीओ बनवून शेयर केला. या व्हिडिओ मध्ये तिने शॉर्ट कपडे घातलेले आहेत. तसेच ती खूप बोल्ङ लुकिंग दिसत आहे.
राजेश्वरी खरात चा हा व्हिडीओ पाहून युजर्स तिच्यावर प्रचंड भ’ड’क’ले आहेत. तिच्या या व्हिडिओवर अनेक अपशब्द वापरत कमेंट्स केल्या आहेत. काही युजर्स तर चक्क तिला म्हणाले की, तुला अजिबात संस्कार नाहीत. लहान कपडे घालून ङान्स करत बसण्यापेक्षा थोडे संस्कारांचे ज्ञान घे. जे तुला भविष्यात उपयोगी पडेल.
मग काय विचारता….. अभिनेत्री राजेश्वरी खरातचा पारा चढला व तिने देखील आपल्या व्हिडीओ वर कमेंट्स करणाऱ्यांना चांगलेच सडेतोड उत्तर दिले आहे. तिने म्हटले आहे की,”सर्वप्रथम तर मी तुम्हां सर्वांची खूप खूप आभारी आहे. कारण तुमच्यामुळेच तर माझ्या सर्व पोस्ट प्रसिद्धीत येतात.
पण त्यासोबतच तुम्हांला हे सांगणे मला गरजेचे वाटते की, तुम्ही मला कितीही ट्रोल केले. तरीही मला काहीच फरक पडत नाही. पण हो, तुम्हांला तुमच्या मधील पुरूषत्वाचा जोर दाखवायचा असेल, तर एखाद्या मूलीच्या कमेंट बॉक्स मध्ये दाखवू नका. त्याऐवजी आपल्या नेत्याजवळ तोच जोर दाखवा व समाजासाठी काहीतरी करा.
मी शॉर्ट्स घालून नाचते, यावर तुम्हांला आक्षेप घेण्याची काही गरज नाही. पूरग्रस्तांसाठी काही करण्याची अपेक्षा तुम्ही ज्या नेत्यांना निवडून दिले आहे ना, त्यांच्याकडून करा. कारण या सर्व कामांसाठी पूर्णतः प्रशासन जबाबदार आहे. सरकार समोर तुम्ही गार पडता, म्हणून काय कुणासमोर सुद्धा जोर दाखवणार का..? हे मला मान्य आहे की, मदतीचा हात हा सर्वांनी द्यायला हवा. परंतु आपण जो टॅक्स भरतो, त्याचा धडधडीत जाब विचारायला शिका.” अशा सणसणीत शब्दांत राजेश्वरीने ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.