फँड्री फेम शालू उर्फ अभिनेत्री राजेश्वरी पडली प्रेमात? व्हिडीओ शेयर करत व्यक्त केल्या तिने आपल्या भावना…
मराठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फँङ्री या चित्रपटात शालू या भूमिकेतून प्रसिद्धीत आलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात हिला तर आपण सर्वजण ओळखतो. फँङ्री मध्ये तिने शालूची साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. तुम्हांला ठाऊक आहे का, शालू म्हणजेच आपली अभिनेत्री राजेश्वरी खरात ही खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
हल्ली तर ती तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळेच सर्वांत जास्त चर्चेत असते. त्यामुळेच तर फॅन फॉलोइंग सुद्धा जबरदस्त आहे. तिचे बरेचसे फोटोज् आणि व्हिडिओज आपण सोशल मीडियावर वायरल होताना पाहतो. दरम्यान हल्ली तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये ती आपण प्रेमात पडले असल्याचे सांगते.
हो मित्रांनो, अगदी बरोबर ऐकलंत तुम्ही… अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये ती ङान्स स्टेप करताना दिसते. या व्हिडिओ मध्ये तिने व्हाईट रंगाचा शॉर्ट स्लिव्हलेस ङ्रेस परिधान केला आहे.
इतकंच नव्हे तर या व्हिडिओ मध्ये ती “चोरी चोरी सपनों में आता है कोई” या गाण्यावर ठुमके लावताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेयर करत तिने लिहिले की,”मुझे प्यार हो गया है” त्यामुळेच तर कित्येक लाईक्स व कमेंट्सचा फॅन्स वर्षाव करत आहेत.
मराठमोळी अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने नागराज मंजुळे यांच्या फँङ्री या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातून तिला खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने आयटमनगरी या चित्रपटात काम केले. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी तिच्या “रेङलाईट” या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले. हा चित्रपट पूर्णपणे वेश्या व्यवसायावर आधारित आहे. त्यामुळेच तर तिच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी जाणून घेण्याची अधिकाधिक उत्सुकता आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.