प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांचा जावई आहे तब्बल इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक, संपूर्ण संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

धनुष साऊथचा लोकप्रिय अभिनेता आणि सिनेमाचा गॉड मानला जाणारा रजनीकांत याचा जावई आहे. धनुष दक्षिण भारतात प्रसिद्ध होता, पण बॉलिवूडचा ‘रंजना’ चित्रपट केल्यावर हिंदी प्रेक्षकांनाही तो खूप आवडला. आज आम्ही तुम्हाला धनुषच्या रॉयल्टीबद्दल एक खास गोष्ट सांगणार आहोत. 28 जुलै, 1983 साली तमीळनाडूमधील थेनी येथे जन्मलेला धनुष वयाच्या 35 व्या वर्षी 72 कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे.

धनुषचा चेन्नईच्या पम्मल येथे एक आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत सुमारे 18 कोटी आहे. 2013 मध्ये त्यांनी हे घर विकत घेतले. याशिवाय त्यांच्याकडे गेस्ट हाऊसदेखील आहे. एवढेच नाही तर धनुषला लक्झरी गाड्यांची सुद्धा आवड आहे. धनुषकडे ऑडी ए 8, बेंटली कॉन्टिनेंटल फ्लाइंग स्पूर, जग्वार एक्सई, रोल्स रॉयस घोस्ट सीरिज – II यासारख्या लक्झरी कार आहेत. या गाड्यांची प्रारंभिक किंमत 5 कोटींपेक्षा जास्त आहे.

धनुषने कधीच अभिनेता बनण्याचा विचार केला नव्हता. त्याला शेफ बनायचे होते. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, शेफ बनण्यासाठी त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करण्याचा विचार केला होता. मात्र त्याच्या भावाने त्याला अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी सांगितले. भावाचे ऐकून त्याने सिनेइंडस्ट्रीत नशीब आजमावण्याचे ठरवले.

धनुषचं खरं नाव वेंकेटेश प्रभू कस्तूरी राज आहे. धनुष या नावामागे देखील एक स्टोरी आहे. वयाच्या 16 व्या वर्षी त्याने चित्रपटातून कारकीर्दीला सुरूवात केली होती.या दरम्यान त्याने नाव बदलण्याचा विचार केला. 1995 साली प्रदर्शित झालेला चित्रपट कुरूद्दीपुन्नलमध्ये धनुष नामक मिशन होते. यामुळेच प्रभावित होऊन वेंकेटेश प्रभूने स्वतःचं नाव धनुष ठेवले.

धनुष साऊथ चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध दिग्दर्शक कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे. धनुषचे खरे नाव व्यंकटेश प्रभु कस्तुरी राजा आहे. धनुषने आपल्या वडिलांच्या दिग्दर्शित ‘थुल्लुवाधो इलामाई” या चित्रपटाद्वारे अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली. 2003 मध्ये धनुषचा ‘तिरुदा तिरुदी’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाला होता. या चित्रपटापासून धनुषने साउथ सिनेमात ओळख मिळविली आहे.

टीओआयच्या अहवालानुसार धनुष एका चित्रपटासाठी 7 ते 10 कोटी रुपये घेतात. या व्यतिरिक्त ते इतर एंडोर्समेंटमधून देखील बरेच पैसे कमवतात. त्यांचा स्टारडम अगदी त्यांच्या सासरे रजनीकांतसारखाच आहे. 2011 मध्ये धनुषला ‘आदुकलम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

रजनीकांत यांच्या मोठ्या मुलीसोबत धनुषने लग्न केले. धनुषपेक्षा रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या दोन वर्ष मोठी आहे. ते दोघे पहिल्यांदा २००३ साली कढाल कोंडीयन या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भेटले होते. २००४ साली दोघे विवाहबंधनात अडकले. धनुष भगवान शिव यांचा भक्त असून त्याने त्याच्या दोन्ही मुलांची नावे यत्र व लिंगा ठेवले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment