सलमान खानच्या आधी या मॉडेलच्या प्रेमात वेडी झाली होती अभिनेत्री ऐश्वर्या राय, जाणून घ्या कोण होता तो मॉडेल…
काही गोष्टी या बऱ्याच वर्षांच्या काळानंतर माहिती होतात. बॉलिवूड मधील गुपित गोष्टी या आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. बॉलिवूड मध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिचं नाव अनेकांशी जोडलं गेलेलं आहे.
आता मात्र फक्त बच्चन कुटुंबाशी जोडलं आहे. कायमच. आता आपल्या लक्षात आलं असेल की कुणाबद्दल बोललं जातंय इथं. होय, ऐश्वर्या राय ( aishvarya ray bachhan ) बद्दल.
ती आज एक लोकप्रिय अशी अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबातील असली तरी सुरुवातीला तिलाही खूप सं’घ’र्ष करावा लागला होता. सलमान खान सोबत आज ही तिचं नाव घेतलं जातं. पण आपल्याला त्याच्या आधीच कोण होतं हे माहीत नसेल. तर चला मग तेच सविस्तर जाणून घेऊयात.
ऐश्वर्या चा फिल्मी प्रवास कसा तर तो म्हणजे मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटातून ऐश्वर्या रायच्या रूपेरी कारकिर्दीस सुरुवात झाली. बॉबी देवलसोबतचा ‘और प्यार हो गया’हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. विश्वसुंदरीचा किताब पटकावणारी ऐश्वर्या रॉय बच्चनचे करोडो चाहते आहेत. ऐश्वर्याच्या प्रोफेशनल लाईफ इतकीच तिची पर्सनल लाईफदेखील नेहमीच चर्चेत राहिली.
ऐश्वर्याचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले आणि तिचे नाव सलमान खानशी जोडले गेले. हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या सेटवर ही प्रेमकहानी फुलली होती. पण काहीच वर्षांत त्यांचे ब्रेकअप झाले. त्यांचं प्रेम हे जगजाहीर झालं होतं. पण म्हणतात ना नेहमी चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी या फार काळ टिकत नाही. त्यांचं नातं ही नाही टिकलं.
सलमान आधी कोण तर ?…ऐश्वर्या राय मॉडेलिंग करत असताना ती राजीव मूलचंदानीसोबत रिलेशनशीपमध्ये होती हे खूप कमी जणांना माहिती आहे. ऐश्वर्याने हे रिलेशनशीप कधीच मीडियात कबूल केले नाही. राजीव हा त्याकाळात अतिशय प्रसिद्ध मॉडेल होता.
बॉलिवूडमध्ये ऐश्वर्याला जसे यश मिळाले तसे तिने राजीवला टाळायला सुरुवात केली असे म्हटले जाते. राजीवनंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एंट्री झाली आणि पुढचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे. सलमानशी ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक आला पण हे नातंसुद्धा खूप काळ टिकले नाही.
त्यानंतर गुरुच्या सेटवर सुरु झाली ती ऐश्वर्या आणि अभिषेकची लव्हस्टोरी. गुरू सिनेमाच्या प्रीमियरनंतर टोरंटोमध्ये अभिषेकने लग्नासाठी ऐश्वर्याला प्रपोज केले. ऐश्वर्याने ही अभिषेकने केलेले प्रपोजल लगेचच स्वीकारले आणि 2007 मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.
आज बॉलिवूड मध्ये असे अनेक जोड्या आहेत की सुरुवातीला सेटवर ओळख मग मैत्री पुढे प्रेम आणि शेवटी लग्न. कसं ऐश्वर्या अभिषेक ने केलं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.