‘तारक मेहता…’ मधील जेठालालची भूमिका नाकारल्याबाबत राजपाल यादव म्हणाले- मी प्रत्येक भूमिका…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील सर्वात महत्वाचे आणि मुख्य पात्र ‘जेठालाल’ आहे. दिलीप जोशी अतिशय चांगल्या प्रकारे जेठालालची भूमिका साकारत आहेत. हलक्या-फुलक्या करमणुकीने भरलेल्या या विनोदी मालिकेला आता 13 वर्षे पूर्ण होणार आहेत.

Dilip Joshi jethalal

‘जेठालाल’ ची भूमिका साकारण्यासाठी या मालिकेच्या निर्मात्यांनी अगोदर प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव यांना ऑफर केली होती. त्यावेळी ही भूमिका साकारण्यास नकार देणार्‍या राजपाल यादव यांनी अखेर याविषयी आपले तोंड उघडले आहे. त्यांना ही भूमिका सोडल्याचे काही दुःख आहे का? विचारले असता राजपाल यांनी या गोष्टीस स्पष्ट नकार दिला.

See also  "तारक मेहता..." मधील पोपटलालने या कारणामुळे सोडली पत्रकारिता, कारण आहे...

रेडिओ होस्ट सिद्धार्थ कनन यांच्याशी बोलताना राजपाल यादव यांनी सांगितले की ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ सोडल्याबद्दल मला काही खेद नाही. राजपाल पुढे म्हणाले- ‘नाही, नाही. एका चांगल्या अभिनेत्याने आणि कलाकाराने जेठालालची भूमिका साकारली आहे. त्यांनी त्या पात्राला चांगली ओळख निर्माण करून दिली आहे. मी प्रत्येक पात्राला कलाकाराचे पात्र मानतो.”

Rajpal Yadav

राजपाल यादव पुढे म्हणाले, “आम्ही एकाच मनोरंजन क्षेत्रातील आहोत त्यामुळे मी दुसर्‍या कलाकाराच्या भूमिकेला माझ्या भूमिकेत फिट करू इच्छित नाही. मला असं वाटतं की जे ही पात्र बनेल ते माझ्यासाठी बनलं पाहिजे, मला ते पात्र साकारण्याचे सौभाग्य मिळावे, परंतु दुसर्‍या कलाकाराने घडवलेले आणि प्रसिद्ध केलेले पात्र साकारण्याची वेळ येऊ नये.”

See also  मेहुण्यांनी हात पाय बांधून कपडे फाटेपर्यंत दाजीला धुतलं, समोर आले ‘हे’ कारण

राजपाल यादव आपल्या शानदार कॉमेडीसाठी ओळखले जातात. त्यांनी चुप चुप के, तू मुझसे शादी करोगी, वक्‍त: रेस अगेन्स्ट टाइम, मैंने प्यार क्यूं किया, भूल भुलैया इत्यादि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच राजपाल हंगामा 2 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टी, परेश रावल, मीजन जाफरी आणि प्रणीता सुभाष यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment