विनोदाचा बादशाह असणाऱ्या राजपाल यादवकडे आहे एवढ्या कोटींची संपत्ती!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये आज आपल्याला गाव खेड्यातील असलेले; पण मुंबईत येऊन आपलं बस्तान बसवून करोडो रुपये कमावणारे कलाकार दिसत असतील. त्यामध्ये शाहरुख खान, राजकुमार राव, आशिष विद्यार्थी, मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर किंवा पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी यांसारख्या अशा कलाकारांची अनेक लिस्ट देता येईल. ज्यामध्ये राजपाल यादव हे एक महत्वाचं नाव आहे.

कोण आहेत राजपाल यादव ?आजवरचे काम पाहून तरी सध्याच्या घडीला राजपाल यादव हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट अश्या खूप जास्तीत जास्त हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे आज प्रत्येकाला हे नाव परिचित आहे.

See also  या बॉलीवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने चक्क महिलेला घातल्या भर रस्त्यात शि'व्या, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

वाचकांनो, राजपाल यादवनेही आपल्या अभिनयामुळे लाखो चाहत्यांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे. कारण हसवणारा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. रडवता तर कुणाला पण येतं.

प्रसिद्ध अभिनेते राजपाल यादव यांनी अत्यंत कठोर परिश्रम करून बॉलिवूड इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे. बरं नुसती ओळख किंवा स्थान नाही तर कमाई सुद्धा भरपूर आहे. राजपाल यादव यांची एका महिन्याची कमाई लाखोंमध्ये असून ते खुप महागडं असं लक्झरी लाइफ जगतात. लाखो करोडो कमावणारे राजपाल यादव आजही भन्नाट जॅम करतात. तेवढ्याच एनर्जी ने.

आता जाणून घेऊया राजपाल यादव नेट वर्थ: म्हणजेच कमाई उच्चांक. यूपीच्या मध्यमवर्गीय कुटुंबातून बॉलिवूडमध्ये पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते राजपाल यादव हे आज करोडोंमध्ये कमावत आहेत, एका इंग्रजी मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजपाल यादव या अभिनेत्याची एकूण संपत्ती 50 कोटी आहे.

See also  अमिताभ आणि रेखा यांचा तो रोमँटिक सीन पाहून, खूप रडल्या होत्या जया बच्चन!

अनेकांना प्रश्न पडतो की हे अभिनेते एवढा पैसा सिनेमे करून कमावतात की अजून दुसरीकडे कुठून ? तर या अभिनेत्याच्या कमाईचा मुख्य स्त्रोत म्हणजे ब्रँड एंडोर्समेंट आणि चित्रपट हेच आहे. राजपाल यादव हे एका महिन्यात 30 लाखांहून अधिक कमावतात. वर्षभराची कमाई 4 कोटींच्या आसपास आहे. यामध्ये मिळालेली काही रक्कम त्याने रियल इस्टेट मध्ये सुद्धा गुंतवलेली आहे. त्याचसोबत मुंबईत महागड्या घरात तो आणि कुटुंब राहतं.

कोणत्या कोणत्या सिनेमात केलं काम ? राजपाल यादवने 1999 मध्ये ‘दिल क्या करे’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत करिअरला सुरुवात केली. यानंतर राम गोपाल वर्मा यांनी ‘जंगल’ चित्रपटात नकारात्मक भूमिका दिली होती. जी सुद्धा खूप गाजवली होती. या भूमिकेने त्याचे नशीब फिरवले. इंडस्ट्रीत ओळख दिली. पुढे केलेल्या काही विनोदी चित्रपटांनी सुद्धा एका प्रकारची नवी ओळख मिळवून दिली.

See also  दुर्दैवी घटनेने या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीचे अख्खे आयुष्य बदलून टाकले, तर सध्या ती करत आहे हे काम...

जन्म कुठं झाला होता माहिती आहे का ? जाणून घ्या मग… राजपाल यादव यांचा जन्म यूपीमधील शाहजहांपूरपासून दूर असलेल्या खांडू नावाच्या गावात झाला होता. त्यांच्यात लहानपणापासूनच अभिनयाची प्रतिभा होती. सुरुवातीच्या शिक्षणानंतर ते पुढील शिक्षणासाठी शाहजहानपूरला गेले. इथूनच त्यांना अभिनयाची गोडी लागली.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment