वडील टेम्पोवर ड्रायव्हिंग करत होते, त्यांना तिथंच कळालं आपला मुलगा तहसीलदार झाला!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

जिद्दी पुढे परिस्थितीनेही टेकले हात….

नुकत्याच लागलेल्या mpsc च्या निकालात राकेश अण्णासाहेब गिड्डे याची तहसीलदार पदी निवड झाली आहे आणि अगोदरच वयाच्या 21 व्या वर्षी नायब तहसीलदार असलेला राकेश जिद्दीने तहसीलदार झाला .. राकेश खूप खूप अभिनंदन 💐💐

खरेतर ,राकेशचा जीवनप्रवास आणि जडणघडण हेच त्याला कुठेतरी यशदा आणि वनामती सारखे प्रशिक्षण देत होते ….mpsc च्या शेवटच्या पेपरला फनफनत्या तापात सुद्धा अभ्यास करताना याला बघितल्यावर संघर्ष म्हणजे काय असतो ते मी जवळून बघिलते. कॉलेज मध्ये जेव्हा आम्ही कॉम्पुटर लॅब मद्ये फ्री इंटरनेट वर काहीतरी timepass करत बसायचो तेव्हा हा मात्र इंटरनेटवर mpsc च्या संबंधित व्हिडीओ बघत असे ..

See also  सिंधुदुर्गातील "ती" च्या जिद्दीची दखल घेतली थेट पंतप्रधान मोदींनी, स्वप्नांतही वाटले नव्हते, ते घडले प्रत्यक्षात...

शालेय जिवणापासूनची वाचनाची प्रचंड आवड कुठेतरी अधिकारी होण्याचे प्रशिक्षणच देत होते ..शेतकऱ्याच्या प्रश्नावरील भाषणाने तू तुज्या वक्तृत्व कलेचा ठसा सगळया कॉलेज वर सोडला होतास 👌 NCC मध्येही तितक्याच उत्साहाने भाग घेणारा तू कब्बडी खेळात rider चा पाय पकडायचे कौशल्य बघताना आम्हाला प्रो कब्बडी बघत असल्यासारखे वाटायचे 😊

माझी अशी परिस्थिती माझी तशी परिस्थिती , मग माझे कसे होणार असे इवळत न बसता माझ्या परिस्थितीमूळेच मला काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा भेटते असे राकेश कायम म्हणतो … आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा तुझा गुण खऱ्या अर्थाने अधिकारी असल्याचे जणू काही ओळखपत्रच असल्यासारखे वाटते . सर्व मित्रांच्या साथीनं आत्तापर्यंत केलेला तुझा प्रवास मागे वळून बघताना आमचे सर्वांचे मन भरून येते .

See also  युट्युब वर धुमाकूळ घालणारी वेब सिरीज 'गावरान मेवा' मधील सरपंच आहे तरी कोण?

आर्थिक परिस्थिती चा बाऊ न करता , मित्रांच्या भक्कम पाठिंब्यावर भाऊ छोट्या-मोठ्या संकटावर लढत राहिला आणि त्यात विजयीही झाला , तुझा विजय हा नक्कीच दिन-दुबळ्यांना , शोषितांना , अडचणीत सापडलेल्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचे काम करेल 👍

तुझ्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐

राकेशचा मार्गदर्शन वजा सल्ला नेहमी हाच असतो की , केवळ सरकारी नोकरी भेटते म्हणून नाही तर लोकांच्या आयुष्यात खूप बदल घडवता येतो म्हनून प्रशासनात या .. चांगला अधिकारी होण्याचे स्वप्न असेल तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही.
|| स्वतःवर विश्वास आणि प्रामाणिक कष्ट केले तर यश दुर नाही. ||

Ganesh Yalmar

वडील टेम्पोवर ड्रायव्हर, आईही जास्त शिकलेली नाही, मात्र त्यांनी आपल्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं आणि त्याच्या पंखात बळ दिलं. मुलानंही आपल्या आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला आणि नायब तहसीलदारनंतर थेट तहसीलदार झाला.

See also  आई झालेल्या या महिला IAS चं जगभरातून कौतूक, कामगिरी पाहून तुम्हीही कराल सलाम!

राकेश यांनी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमधून IT मध्ये पदवी मिळवली. २०१७ साली पदवीच्या शेवटच्या वर्षालाच त्यांनी नायब तहसीलदार होण्याची किमया केली. सध्या ते नांदेड इथं कार्यरत आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment