‘देवा हो देवा गणपती देवा’ सुपरहिट गाण्याचे निर्माते संगीतकार ‘राम-लक्ष्मण’ यांचं नि’धन…
सध्याच्या काळाच्या प्रवासात खूप गळती लागलेली आहे. म्हणजे एक ना एक जण आपल्याला सोडून जात आहे. काहींचं जाण्याचं कारण कोरोना तर काहींच वेगळं. सध्या कला क्षेत्रात तर खूप दुःखाची जशी चादर पांघरलेली आहे असं झालेलं आहे. कारण अनेक दिग्गज आता आपल्याला सोडून जात आहेत. त्यात आज आणखी एक भर पडलेली आहे. बॉलिवूड मधील या दिगग्ज संगीत काराचं नुकतंच नि’ध’न झालं.
मराठी आणि हिंदी या दोन्ही सिनेसृष्टीत आपल्या गाण्यांच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे जेष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांचं नि’ध’न झालं आहे. ते 78 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते एका दिर्घ आ’जा’रा’मुळं त्र’स्त होते. 21 मे रोजी रात्री 1 वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. राम लक्ष्मण यांच्या नि’ध’नामुळं भारतीय संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आज श्रद्धांजली वाहनं हे रोजचं काम होऊन बसल्यासारखं झालेलं आहे. कारण कोण ना कोण तरी निरोप घेत आहे. अश्यात आता एक प्रसिद्ध संगीतकार आपल्याला सोडून गेले. याचं त्यांच्या चाहत्यांना ही खूप दुःख झालेलं आहे.
त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी बद्दल अनेकांना माहीत नसेल. त्यावर जरा एक नजर टाकूयात. आणि गेलेल्या माणसाच्या स्मृति मध्ये थोडं विसवूया. राम-लक्ष्मण यांचं खरं नाव विजय पाटील असं होतं. ते आपला खास मित्र राम कदम यांच्या मदतीनं संगीतनिर्मितीचं कार्य करत होते. 1976 पर्यंत राम कदम व विजय पाटील ही जोडी ‘राम-लक्ष्मण’ ह्या नावानं संगीत द्यायचे. मात्र 1977 मध्ये राम कदम यांचं नि’ध’न झालं. परंतु आपल्या मित्राच्या आठवणीत ‘राम-लक्ष्मण’ या नावानच संगीत देणं सुरू ठेवलं. राम-लक्ष्मण यांनी मराठीसह हिंदीतही आपल्या संगीताची वेगळी छाप सोडलेली होती.
बरं ते एकाच इंडस्ट्री मध्ये म्हणजे हिंदी मध्येच फक्त काम करत नव्हते. तर राम लक्ष्मण हे बहुरंगी कलाकार होते. मराठी , भोजपुरी आणि हिंदी सहित इतर अनेक भाषांत त्यांनी काम केलेले आहे. यावरून कळतं की ते किती प्रतिभावंत होते.
त्यांनी मराठीत ‘पांडू हवालदार’ या चित्रपटातून आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘हम से बढकर कौन’ चित्रपटातलं ‘देवा हो देवा गणपती देवा’ या गाण्यानं त्यांना प्रसिद्धी मिळाली. राम-लक्ष्मण यांनी देवानंद, मनमोहन देसाई, महेश भट्ट, दादा कोंडके यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम केलं होतं.
‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाबद्दल त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी ‘पत्थर के फूल’, ‘सातवा आस्मान’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ आदी सिनेमांना संगीत दिलं होतं. त्यांनी आजवर 75 हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमांना संगीत दिलं आहे. ‘अंजनीच्या सुता तुला’, ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ‘जीवन गाणे गातच रहावे’, ‘झाल्या तिन्ही सांजा करून’, ‘पिकलं जाभूळ तोडू नका’ या त्यांच्या गाण्यांनी मराठी मनावर अधिराज्य निर्माण केलं होतं.
आज अपल्यालातून संगीत विश्वातून एक खूप महत्त्वाचा मोलाचा जेष्ठ अनुभूवी तारा हरपला आहे. घरावर आणि चाहत्यांनवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. तरी त्या प्रसिद्ध संगीत कार यांना स्टार मराठी कडून भावपूर्ण श्रद्धांजली.