साताऱ्यातील या आजोबांना दररोज खावे लागतात 250 ग्रॅम दगड, यामागील कारण ऐकून धक्का बसेल!
“मातीचा हा सुगंध न्यारा” मित्रांनो तुम्हांला मातीचा भन्नाट सुगंध आवडतो का हो? आणि त्यात ओल्या मातीचा सुगंध म्हणजे फुल टू भन्नाट. गरोदरपणात अनेक स्त्रिया आवर्जून मातीची चव चाखतात. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही कित्येक लहान मुलांना कधीतरी माती खाताना तर पाहिलेच असेल. ज्या मुलांमध्ये कॅल्शियम कमी असते, त्यांना माती खाण्याची लहर जास्त येते. मात्र आज आम्ही तुम्हांला अशा एका 80 वर्षांंच्या आजोबांबद्धल सांगणार आहोत, जे दररोज 250 ग्रॅम मातीचे तुकडे अगदी सहजपणे खातात.
अहो, एवढं थक्क होऊ नका. हे अगदी खरं आहे. हे 80 वर्षीय आजोबा काही आज काल पासून माती खात नाहीत. तर त्यांना आतापर्यंत 31 वर्षे पूर्ण झाली आहेत. आम्ही तुम्हांला ज्या आजोबांबद्धल सांगत आहोत, ते महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात राहतात. यांचे नाव रामभाऊ बोडके असे आहे. त्यांच्या गावातील लोक या आजोबांना “दगड खाणारे आजोबा” म्हणूनच ओळखतात.
रामभाऊ आजोबांच्या खिशात नेहमी दगडाचे तुकडे असतात. इतर लोक जसे तंबाखू- चुना चघळतात. अगदी त्याचप्रमाणे हे आजोबा आपले मन झाल्यावर लगेचच खिशातील दगड काढून चघळायला सुरुवात करतात. जेव्हा ङॉक्टरांना या दगड खाणाऱ्या आजोबांविषयी समजले, तेव्हा ते सुद्धा अक्षरशः हैराण झाले.
रामभाऊ बोडके या आजोबांनी म्हटले की, 1989 मध्ये ते कामाच्या शोधात मुंबईत आले होते. येथे त्यांना पोटदुखीची समस्या जाणवू लागली. त्यानंतर हे रामभाऊ आजोबा यांनी तीन वर्षे पोटदुखीवर इलाज केला, मात्र त्यांना काहीही आराम मिळाला नाही. पुढे त्यांनी मुंबई सोडून आपल्या गावी साताऱ्यात येऊन शेती करायला सुरुवात केली. पण तरीही त्यांना पोटदुखीवर कोणताही आराम मिळाला नाही.
त्यानंतर एका वृद्ध स्त्रीने या आजोबांना दगड खाण्याचा सल्ला दिला. बस्स… त्यानंतर मग पुढे रामभाऊ बोडके आजोबांनी नियमीतपणे न विसरता मातीचे दगड खायला सुरुवात केली. यामुळे त्यांच्या पोटदुखीवर देखील त्यांना खूप आराम मिळाला. आता हे रामभाऊ आजोबा माती खात आहेत, याला तब्बल 31 वर्षे पूर्ण झाली आहेत.
काही दिवसांपूर्वी या आजोबांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला, त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे प्रक्रिये दरम्यान सीटीस्कॅन केले असता, त्यांच्या पोटात कित्येक दगड आढळून आले. हे पाहून तर ङॉक्टर देखील हैरान झाले. दररोज 250 ग्रॅम दगड खाऊन देखील हे आजोबा कसे बरे जीवंत राहिले, हा विचार करून ङॉक्टर देखील विचारात पडले. तर सध्या या आजोबांची तब्येत अगदी व्यवस्थित आहे. तर ङॉक्टरांनी पुन्हा त्यांना मातीचे दगड न खाण्याचा सल्ला दिला आहे. परंतु आता हे रामभाऊ बोडके आजोबा कितपत आपल्या या वर्षांपूर्वीची सवयीवर कंट्रोल करू शकतात का, हे पाहणे एक ट्विस्ट आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.