या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीच्या प्रेमात वेडा झाला होता रणबीर कपूर, पण जेव्हा त्या अभिनेत्याला कळले तेव्हा…
रणबीर कपूरचा पहिला चित्रपट ‘सावरिया’ हा मोठ्या पडद्यावर फ्लॉप ठरला असला तरी त्याने आपल्या पहिल्याच चित्रपटाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलेलं आहे हे नक्की. आजच्या युगात रणबीर कपूर हे नाव प्रत्येक दिग्दर्शक निर्मात्याची निवड आहे. रणबीर कपूर 28 सप्टेंबर रोजी आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म सुपरस्टार दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या घरी झाला.
तो बॉलिवूडच्या सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध कुटुंब कपूर कुटुंबातील चौथी पिढी आहे. कपूर घराण्याचे नाव रणबीर कपूरशी जोडले जाऊ शकते, परंतु त्याने आपल्या चमकदार अभिनयाने करोडो लोकांची मने जिंकली. आणि स्वतः स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे.
रणबीर कपूरने मुंबईतून शिक्षण घेतले… रणबीर कपूरने मुंबईतूनच शिक्षण पूर्ण केले आहे. एकदा रणबीरने स्वतः खुलासा केला होता की तो लहान असताना त्याला अभ्यास करायला अजिबात आवडत नव्हते. रणबीर कपूर दक्षिण मुंबईच्या माहीम येथील बॉ’म्बे स्कॉटिश शाळेत शिकलेला आहे. जेव्हा रणबीर हा दहावी उत्तीर्ण झाला, तेव्हा त्याची आजी कृष्णराज कपूरने घरी पार्टी आयोजित केली होती. ज्यात अनेक तारे सहभागी झाले होते. रणबीरने खुलासा केला होता की त्याने कपूर कुटुंबात सर्वात जास्त अभ्यास केला आहे.
कपिल शर्माच्या शोमध्ये खोटे बोलले होते. ऐश्वर्या रायने स्वतः खुलासा केला होता की, रणबीर कपूर ने ऐश्वर्या रायला 10 वी तले खोटे मार्क सांगितलेले आहेत.खरे तर 54.3% रणबीरच्या 10 वीत मार्क आले होते. पण रणबीरने ऐश्वर्या रायला 65% सांगितले होते.
इमरान खानची पत्नी अवंतिका आणि रणबीर रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी इम्रान खानची पत्नी अवंतिका मलिकला डेट केले आहे. ही गोष्ट खूप जुनी आहे. जेव्हा ते दोघेही अगदी लहान होते, त्या काळात दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. रणबीरचा अवंतिकावर प्रचंड क्रश होता. अवंतिकाने ‘जस्ट मोहब्बत’ या टीव्ही सीरियलमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे.
रणबीरला अवंतिका इतकी आवडली की तो तिला दररोज या टीव्ही शोच्या सेटवर भेटायला जायचा. बातमीनुसार, दोघेही जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. आणि पुढे मात्र दोघे फार काळ एकत्र राहू शकली नाही. अवंतिका ने पुढे इमरान खान शी लग्न केलं आहे. आणि रणबीर आता दीपिका सोडून आलिया ला डेट करत आहे. लवकरच तेही लग्न करतील अशी चाहत्यांना, प्रेक्षकांना आशा आहे.