जर या प्रसिद्ध अभिनेत्याने हे चित्रपट नाकारले नसते तर कदाचित आज रणवीर सिंह हिरो नसता…
बॉलिवूड मध्ये आज अनेक स्टार येतात आणि जातात. पण या सर्वांमध्ये रणविर सिंह ( ranveer singh ) हा सुपरस्टार आता प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसत आहे. बॉलिवूड मध्ये त्याने त्याचा एक वेगळाच दरारा निर्माण केलेला आहे. पण आपल्याला हे माहिती आहे का ? त्याने जे चित्रपट करून आज आपलं स्थान इंडस्ट्रीत फिट्ट केलेलं आहे ते कश्या मुळे.
अर्थात म्हणजे इथं त्याचं अभिनय कौशल्य असणारच. पण त्याला जे चित्रपट मिळाले ते सर्व आधी दुसऱ्या अभिनेत्या ला ऑफर झाले होते. आता तो अभिनेता कोण आणि या गोष्टी ची पूर्ण माहिती काय चला हे सगळं एकत्र सविस्तर जाणून घेऊ.
सगळ्यात आधी काय तर नुकताच बॉलिवूडचा गली बॉय रणवीर सिंहचा वाढदिवस झालेला आहे. त्यामुळे त्याच्या विषयी अनेक गोष्टी निघाल्या. वाढदिवस असताना अनेक सेलिब्रिटींसह चाहते सोशल मीडियावरून रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते.. कारण त्याचं सोशल मीडिया परिवार शी खूप चांगलं नातं आहे. आपल्या दमदार अभिनयाने रणवीरने बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलंय. पण तुम्हाला माहित आहे का? ज्या अनेक सिनेमांमुळे रणवीर स्टार बनला ते सिनेमा आधी अभिनेता रणबीर कपूरला ऑफर झाले होते.
रणवीर सिंहच्या करिअरमधील चार हिट ठरलेले सिनेमा आधी रणबीर कपूरला ऑफर करण्यात आले होते. मात्र रणबीर कपूरने या ऑफर नाकारल्याने ते सिनेमा रणवीरला करण्याची संधी मिळाली आणि तो सुपरस्टार झाला.
यातला पहिलाच सिनेमा म्हणजे ‘बॅण्ड बाजा बारात’ या सिनेमातून रणवीरने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. अनुष्का शर्मा आणि रणवीरच्या जोडीला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. मात्र रणवीर आधी हा सिनेमा रणबीर कपूरला ऑफर करण्यात आला होता.
यातला पहिलाच सिनेमा म्हणजे ‘बॅण्ड बाजा बारात’ या सिनेमातून रणवीरने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. अनुष्का शर्मा आणि रणवीरच्या जोडीला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. मात्र रणवीर आधी हा सिनेमा रणबीर कपूरला ऑफर करण्यात आला होता.
संजय लीला भन्साळींचा ‘राम लीला’ या सिनेमाने प्रेक्षकांना भुऱळ घातली होती. या सिनेमात रणवीर आणि दीपिका पदूकोण पहिल्यांदा एकत्र झळकले. या सिनेमाच्या शूटिंगपासूनच त्याच्या लव्ह स्टोरीला देखील सुरुवात झाली होती. मात्र या सिनेमासाठी देखील भन्साळींनी आधी रणबीर कपूरची निवड केली होती. तर याचवेळी दिग्दर्शक अनुराग कश्यपने ‘बॉम्बे वेलवेट’ या सिनेमासाठी देखील रणवीर सिंहला निवडलं होतं. मात्र कालांतराने अनुराग अश्यपने रणवीर ऐवजी रणबीर कपूरला सिनेमात घेतलं. तर ‘राम लीला’साठी रणवीर सिंहला कास्ट करण्यात आलं.
यशराज फिल्मचा रणबीर कपूरने रिजेक्ट केलला आणखी एक प्रोजेक्ट म्हणजे ‘बेफिक्रे’ हा सिनेमा. या सिनेमात नंतर रणवीर सिंहने त्याची जादू दाखवली. या सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नसला तरी तरुणांनी मात्र सिनेमाला पसंती दिली होती.
यशराज फिल्मचा रणबीर कपूरने रिजेक्ट केलला आणखी एक प्रोजेक्ट म्हणजे ‘बेफिक्रे’ हा सिनेमा. या सिनेमात नंतर रणवीर सिंहने त्याची जादू दाखवली. या सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नसला तरी तरुणांनी मात्र सिनेमाला पसंती दिली होती.
जोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ या सिनेमामुळे रणवीर सिंहचं मोठं कौतुक झालं. या सिनेमाने सर्वांचीच मनं जिकंली होती. या सिनेमासाठी रणबीर कपूरला सिद्धांत चतुर्वेदीच्या एमसी शेरच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र रणबीरला सपोर्टिंग रोल करायचा नसल्याने त्याने ही ऑफर नाकारली.
रणवीर सिंहने आजवर रोमॅण्टिंक हिरो ते बाजीराव सारख्या ऐतिहासिक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. रणवीर सिंह हा आज बॉलिवूड चा लोकप्रिय असा अभिनेता आहे. बरं त्याची एवढीच ओळख नाहीये. त्याने आत्तापर्यंत जेवढे कामे केलेली आहेत ती सगळी केल्याने तो इथपर्यंत आलेला आहे. रणवीर सिंह ला त्याच्या पुढील अश्याच एनर्जीटिक वाटचाली साठी स्टार मराठी कडून स्टार शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.