‘तिथे’ पडली होती ठाकरे आणि राणे वा’दा’ची ठिणगी; राज सह वहिनीही होत्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात…

‘त्या’ म'र्ड'र प्रकरणानंतर राणे झाले शिवसेनेपासून दूर; वाचा, नेमका काय होता विषय

बाळसाहेब ठाकरे यांना बिंदूमाधव, उद्धव आणि जयदीप अशी 3 मुले होती. त्यापैकी बिंदू माधव यांच्या मृ’त्यु’नंतर त्यांच्या पत्नीने ‘मातोश्री’ सोडली. जयदीप यांच्या पत्नी या चित्रपट निर्मिती व्यवसायात उतरल्या होत्या. त्या दरम्यान सोनू निगम आणि ठाकरे कुटुंब हा वा’द सुरु झाला. त्यानंतर काही दिवसांनी हा वा’द शमला होता. त्यानंतर ठाकरे कुटुंबात धुसफूस असल्याचे समोर आले.

uddhavbal 1569678127

कुठलेही राजकीय कारण नसताना ठाकरे कुटुंबात एकमेकांविषयी नाराजी वाढली होती. ही नाराजी इतकी मोठी होती की, उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेले काही निर्णय पटत नसल्याने उद्धव ठाकरे काही निर्णय परस्पर बदलत होते. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत राणेंनी ठाकरेंवर असे अनेक आरोप करत बाळासाहेब आणि उद्धव यांच्यातील संबंधाविषयी भाष्य केले होते.

सध्या राज्याच्या राजकारणात राणे कुटुंब हे एकमेव असे आहे की, जे उद्धव ठाकरेंवर एकेरी आणि अर्वाच्य भाषेत टी’का करत असतात. आजवर अनेकांनी शिवसेना सोडली. मात्र शिवसेनेशी इतका टोकाचा वि’रो’ध फक्त नारायण राणेंनी बाळगला.

READ  तेव्हा शरद पवारांनी म्हटले होते; 'पंकजा मुंडे या राजकारणातील दीपिका पदुकोन आहेत'

2020 8$largeimg 327640644

चेंबूरचे शाखाप्रमुख, नगरसेवक, मग मुंबईची सार्वजनिक परिवहन सेवा ‘बेस्ट’चे अध्यक्ष आणि शेवटी मुख्यमंत्री अशी राणेंची राजकीय कमान चढती राहिली. आता परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेने राणेंना इतके देऊनही ते शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर कायमच टी’के’ची तो’फ का डा’ग’त असतात? हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात कधीच काहीच आलबेल नव्हते. मनोहर जोशींना हटवून नारायण राणेंना मुख्यमंत्री केलेलं उद्धव ठाकरेंना आवडलेलं नव्हतं. तर उद्धव ठाकरे जेव्हा शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले, तेव्हा नारायण राणेंनी त्याचा क’डा’डू’न वि’रो’ध केला होता. अगदी बाळासाहेबांची गाठ घेत राणेंनी आपला वि’रो’ध सांगितला. मात्र ‘नारायण, आता निर्णय झाला आहे’, असे सांगत बाळासाहेबांनी नारायण राणेंकडे दुर्लक्ष केले.

Narayan Rane Bal Thackeary

आता मात्र शिवसेनेत उघड उघड २ गट पडले होते. पहिल्या म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या गटात मनोहर जोशी आणि सुभाष देसाई अशी नेते मंडळी होती तर नाराज असणाऱ्या दुसऱ्या गटात राज ठाकरे, नारायण राणे आणि स्मिता ठाकरे होते.

READ  राजकारणात नसते तर ‘तिथे’ असते राज ठाकरे; वाचा, स्वतः राज ठाकरेंनीच सांगितलेली माहिती

दिवसेंदिवस या दोन्ही गटातील त’णा’व वाढत होता. 2000 सालापासून हा त’णा’व इतका वाढला की, नारायण राणे हे थेट उद्धव ठाकरेंवर टी’का करू लागले. 2003 मध्ये शिवसेनेच्या महाबळेश्वर अधिवेशनानंतर उद्धव कार्याध्यक्ष झाले आणि पक्षाच्या प्रत्येक निर्णयप्रक्रियेत सहभागी झाले. आता राज आणि नारायण राणे यांना डावलले जाऊ लागले होते.

Shiv Sena chief Bal Thackeray Narayan Rane and Gopinath Mund

2002 मध्ये एक मोठी घ’ट’ना घ’ड’ली होती. ज्या घ’ट’ने’नंतर नारायण राणेंनी शिवसेनेशी कसे वागायचे हे ठरवले. कोकणात जेवढा गोडवा आहे तेवढेच कोकणचे राजकारण कठीण आहे.

2002 मध्ये नारायण राणे विरोधी पक्षनेते होते. त्यांच्या हातातून आता निर्णयप्रक्रिया गेली होती. तसेच राणेंचे शिवसेनेतील महत्व कमी होऊ लागले होते, असे सर्वांना(अगदी शिवसेना नेत्यांनाही) जाणवत होते. दरम्यान कोकणातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांची ह’त्या झाली.

820794 narayan rane dna

या घ’ट’ने’नंतर कोकणात मोठी ख’ळ’ब’ळ उडाली. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी/लोकांनी राणे यांच्या घरावर ह’ल्ला’बो’ल केला. राणेंच्या कणकवलीत असणाऱ्या घराची जा’ळ’पो’ळ केली. त्यावेळी राणे एकटे पडले. राणे विरोधीपक्षनेते असताना त्यांच्या पक्षातील एकाही नेत्याने राणेंची गाठ घेतली नाही. किंवा राणेंच्या पाठीशी खंबीर भूमिका घेतली नाही.

READ  कोण होऊ शकतो शरद पवारांचा वारसदार? वाचा, काय आहेत अजितदादा आणि सुप्रियाताईंच्या शक्यता...

शेवटी 2003 मध्ये बाळासाहेब ठाकरेंना उद्धव यांची उत्तराधिकारी म्हणून निवड करताना कुणाची अडचण व्हावी, असे वाटत होते. म्हणून बाळासाहेबांनी जाणीवपूर्वक राजकारण केले आणि राणे व राज हे अलगद बाजूला झाले.

uddav jpg

अखेर नाराज आणि डावलल्या गेलेल्या राणेंनी 2005 मध्ये शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत कॉंग्रेसचा हात हातात धरला. काही काळानंतर राजही वेगळे झाले आणि राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment