रानु मंडलचा नवीन व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल, नेटकरी म्हणाले, “ही म्हणजे…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मागच्या वर्षी काही सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रानू मंडल या रस्त्यावर जीवन जगणाऱ्या गायिकेचं नशीब अशा प्रकारे बदलले की ती चक्क सेलिब्रिटीच बनली. लोक रानूच्या आवाजात एवढे गुंतले की सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या वाढत गेली. पण यश हातातून कधी सुटेल हे सांगता येत नाही. एक प्यार का नगमा है हे गाणं गाऊन प्रसिद्ध झालेली रानू मंडल पुन्हा तिच्या आयुष्यात अंधार पडली आहे.

ती कोठे आहे आणि गेल्या अनेक महिन्यांपासून ती काय करत आहे हे कोणालाही माहित नाही. पण अश्यात एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. जो व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये रानू ने श्रीलंकन ​​गाणे ‘मणिके मांगे हिते’ गाताना दिसत आहे. नेहमी साडीत दिसणारी रानू यावेळी लाल टी-शर्टमध्ये दिसत आहे.

See also  नेहा कक्कर व रोहनप्रीत मध्ये झाले कडाक्याचे 'भां'डण', व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल...

रानू मंडल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि इंटरनेटवर व्हायरल होऊन वर्चस्व गाजवत आहे. सोशल मीडियावर, व्हिडिओ पाहून युजर चांगलीच प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की- पुन्हा पुन्हा व्हायरल होऊन यश मिळत नाही. एका युजरने तर तिच्या गाण्याला महाआपत्ती म्हटले आहे. दुसर्‍याने लिहिले, ‘आता कोणालाही हे पाहणे किंवा ऐकणे आवडत नाही’.

यापूर्वी रानू मंडलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ती कारच्या बाहेर माइक धरून लताजींचे गाणे गाताना दिसत होती.

तसेच तिचा अंगावरचा पोशाख खूप जुना होता. कोरोना वि’षा’णूमुळे रानूची प्रकृती पुन्हा पूर्णपणे ढासळली होती. सध्या रानूला मुंबईत कोणतेही काम मिळत नसल्याचे वृत्त आहे. सध्या एका व्हिडीओ मार्फत रानूबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. ज्यावर युजर म्हणत आहेत की हा तर चार दिवसांचा चंद्रप्रकाश नंतर काळी रात्र.

See also  "लस घ्यायला आलीस की फॅशन शो ला आली तू?" असा जाब विचारत अभिनेत्री मलाइका अरोरा झाली जबरदस्त ट्रोल...

Leave a Comment