1 कोटींची मर्सिडीज ते 3 कोटींची लेम्बोर्गिनी, रणवीर सिंगच्या गॅरेजमध्ये आहे एक से एक गाड्यांचा संग्रह…
रणवीर सिंह हा बॉलिवूडचा एक असा अभिनेता आहे जो आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखला जातो, तर तो स्वत:ला कुठल्याही पात्रामध्ये परिवर्तित करु शकतो. त्याने बॉलिवूडला आजवर खूप चांगले चित्रपट दिले आहेत. यामुळे रणवीर सिंगची चांगली फॅन फॉलोइंग आहे. तसे, रणवीर सिंगला केवळ अभिनयाची आवड नाही तर त्याचवेळी त्याला ऑटोमोबाईल क्षेत्राची पण जबरदस्त आवड आहे.
विशेषतः त्याला लेटेस्ट मॉडेलच्या लक्झरी गाड्या खूपच आवडतात. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या गॅरेजमध्ये अत्यंत महागड्या लक्झरी गाड्यांचा संग्रह आहे. ऍस्टन मार्टिनपासून तर मारुती सियाझपर्यंत सर्व काही रणवीर सिंगच्या गॅरेजमध्ये आहे. चला तर मग रणवीर सिंगच्या कार कलेक्शनवर एक नजर टाकूयात.
रणवीर सिंगच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंझ जीएलएस आहे. हीची शोरूम किंमत 83 लाख रुपये आहे. या वाहनात अनेकदा रणवीर सिंग आणि दीपिका आढळतात. यात 3.0 लीटर, व्ही 6 इंजिन आहे जे जास्तीत जास्त 255 बीएचपी पावर आणि 620 न्यूटन मीटर टॉर्क उत्पन्न करते.
ऍस्टन मार्टिन रॅपिड एस ही रणवीर सिंग, दीपिका यांच्या मालकीची सर्वात महागड्या कार आहे. यात 6.0-लीटर व्ही 12 इंजिन दिले गेले आहे जे 552 बीएचपी पॉवर आणि 620 एनएम टॉर्क जनरेट करते. कारचे आतील भाग कुशल कारागिरांनी हाताने बनविलेले आहे. या कारची किंमत 3.29. कोटी रुपये आहे.
रेंज रोव्हर वॉग रणवीर सिंगच्या कार कलेक्शनमध्ये एक रेंज रोव्हर वॉग सुद्धावसमाविष्ट आहे. व्हाईट रंगाची ही लक्झरी एसयूव्ही 5.0 लीटर, व्ही 8 इंजिनसह सुसज्ज आहे. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 1.58 कोटी रुपये आहे. लँड क्रूझर प्राडो रणवीरकडे लँड क्रूझर प्राडो कारही आहे. यात 3.0 लीटर डिझेल इंजिन आहे तसेच 170 बीएचपीची शक्ती आणि 410 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते.
मारुती सुझुकी सियाझ देखील रणवीरची मारुती सुझुकी सियाझ आहे. 2014 मध्ये लॉन्च दरम्यान मारुतीने ही गाडी रणवीर सिंगला गिफ्ट केले होते. त्याची एक्स-शोरूम किंमत 8.04 लाख रुपये पासून सुरू होते. रणवीरच्या कार संग्रहात जगवार एक्सजेएल देखील आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 99.56 लाख रुपये आहे. त्याचे इंजिन 296 बीएचपीची इतकी जास्त पॉवर देते.
लॅम्बोर्गिनी उरुस रणवीर सिंगने 2019 च्या सुरुवातीच्या काळात लेम्बोर्गिनी उरुसला त्यांच्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट केले. एज डिझाइनसह कार वेगवान एसयूव्हींपैकी एक आहे. उरुस ही पहिली चार दरवाजे असलेली लॅम्बोर्गिनी आहे. ज्यामुळे ही सुपरकार इतर कार्सपेक्षा एक पायरी वरचढ ठरते. रणवीरला रेड उरसमध्ये बऱ्याचदा स्पॉट केले गेले आहे. ही कार 3996 सीसी इंजिनसह असून तिची किंमत 3.10 कोटी रुपये आहे. असो! तर हा होता, रणवीर सिंग आणि दीपिकाच्या गॅरेजमधील एक फेरफटका.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.