सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपेने यशस्वी होणार या 7 भाग्यवान राशी, जाणून घ्या आजचे राशिभविष्य…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

जय जय सदगुरू गजानना | रक्षक तूची भक्तजना ||
निर्गुण तू परमात्मा तू | सगुण रुपात गजानन तू ||

आज शेगावनरेश श्री गजानन महाराजांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ७ भाग्यवान राशी आहेत…वृषभ, मिथुन, सिंह, तूळ, वृश्चिक, कुंभ आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष:
आज ग्रह आपल्याला आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देताहेत. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बरीच मेहनत घेतल्यानंतरही थोडेसेच यश मिळू शकेल. तुम्ही मुलांविषयी चिंतीत रहाल. कामाशी संबंधित समस्यांमुळे आपण कुटुंबातील सदस्यांकडे कमी लक्ष देऊ शकाल. अविचार, समाजविघातक कृती आणि आयोजन यांपासून दूर रहा. पोटाच्या आजारामुळे तुम्ही अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. गरज वा अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळा किंवा पुढे ढकला. सरकारी कामात विलंबाने यश मिळेल.

वृषभ:
आज तुम्हाला कोणतेही कार्य करण्यासाठी दृढ मनोबल आणि आत्मविश्वासाचे संपूर्ण सहकार्य मिळेल. ग्रहांचे आशीर्वाद तुमच्यापाठी आहेत. अपेक्षेप्रमाणे कार्याचा निकालही तुम्हाला मिळेल. संततीकडून लाभ, सुवार्ता प्राप्त होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये रस असेल. सरकार संबंधित नोकरी, व्यवसाय क्षेत्रात नफा आणि आर्थिक यश मिळेल. कौटुंबिक खर्च होईल.

मिथुन:
नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, असं ग्रह म्हणतात. सरकार संबंधित बाबींकडून नफा मिळण्याचीही शक्यता आहे. व्यावसायिक किंवा व्यापार क्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. छोटे प्रवास आयोजित केले जाऊ शकतात. जर मित्र वा प्रियजन किंवा शेजाऱ्यांमध्ये मतभेद झाल्याची घटना घडली तर त्याचे चांगले परिणाम तुमच्याच बाजूने होतील. वैचारिकदृष्ट्या त्वरित निर्णयबदल होऊन शुभफळं प्राप्त होतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आर्थिक दृष्टिकोनातून सावधगिरी बाळगल्यास संभाव्य नुकसानही टळेल असा ग्रहांचा सल्ला आहे.

See also  स्वप्नात जेवढे धन पाहिले त्यापेक्षा डबल लाभ होणार, आई श्री जगदंबा 7 राशीला देणार सुख समृद्धी...

कर्क:
आज ग्रह नकारात्मक मानसिकतेने वागू नका असा सल्ला देतात. आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. अंतःकरणात दु:ख आणि असंतोषाच्या भावना असतील. डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही. कुटुंबातील सदस्यांशी कोणताही गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. चांगला अभ्यास करुनही, विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळणार नाही. अनैतिक प्रवृत्तींपासून दूर रहा. आज अधिक खर्च होईल.

सिंह:
आज आपल्यामध्ये आत्मविश्वासाचे प्रमाण अधिक असेल, असे ग्रह म्हणतात. कोणतेही कार्य करण्यासाठी तुम्ही लवकर निर्णय घ्याल. वडीलधाऱ्यांकडून फायदा होईल. सामाजिकदृष्ट्या मान सन्मान, आदर वाढेल. ग्रहाचा सल्ला आहे की, बोलणे व वागण्यातील राग कमी करून नम्रता ठेवली तर फायदाच होईल. आरोग्य ठीक राहील.

कन्या:
आज तुमच्या अहंकाराचा तुमच्यासह इतरांना त्रास होऊन कोणाशीही वादविवाद, भांडण होत असेल तर ते टाळण्याची काळजी घ्यावी असा ग्रहाचा सल्ला आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आज त्रस्त असाल. मित्र आणि कुटूंबियांसह वैचारिक पातळीवर मतभेद होतील. स्वभावात क्रोधाचे प्रमाण अत्याधिक असेल. धार्मिक कामासाठी पैसा खर्च होईल. आरोग्याबद्दल काळजी घ्या. अचानक पैशांचा खर्च होऊ शकतो. शक्य असल्यास वादविवाद टाळाच.

See also  या 8 राशींना सुख आणि धन प्राप्ती होणार, श्री शनी देव देत आहेत विशेष आशीर्वाद, दुः'ख देखील हरणार…

तूळ :
हा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल, असे ग्रह म्हणतात. तुम्हाला विविध क्षेत्रात मिळणाऱ्या फायद्यांमुळे तुमचा आनंद वाढेल. तुमचे उत्पन्नही वाढेल. मित्रांच्या साठी खर्च होईल आणि त्यांच्याकडून फायदेही मिळतील. पर्यटन स्थळी प्रवास किंवा भेट दिल्यामुळे दिवस रोमांचक होईल. आज विवाह इच्छूकांना जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. स्वरुची भोजन मिळेल.

वृश्चिक:
हा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल, असे ग्रह म्हणतात. नोकरी, व्यावसायिक कार्यस्थळावरील वातावरण अनुकूल असेल. उच्च अधिकारी आनंदी होतील. आज कामात यश मिळवणे सोपे होईल. तुमची प्रतिष्ठाही वाढेल. नोकरीत पदोन्नती मिळेल. घरगुती जीवनात आनंदाचे वातावरणही राहील. व्यवसायाच्या उद्देशाने प्रवास घडू शकतो. संततीच्या प्रगतीमुळे समाधानाचा अनुभव घ्याल.

धनु :
आज आरोग्य काही प्रमाणात नरम-गरम राहील. शारीरिक अस्वस्थता आणि आळशीपणाची भावना प्रबळ असेल. मानसिक चिंतेने त्रस्त रहाल व्यापार, व्यावसायिक नुकसानही होऊ शकते. शक्यतो नकारात्मक, हानिकारक विचार दूर ठेवा. कोणतीही कामे काळजीपूर्वकच हाताळा. वरिष्ठांशी खटके उडतील. शक्यतो प्रतिस्पर्धी आणि विरोधकांशी वाद घालूच नका.

मकर:
आज आपल्या राशीला आकस्मिक आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. व्यावहारिक आणि सामाजिक कार्यासाठी बाहेर जाण्यामुळेही अधिकचा खर्च होऊ शकतो. आहार आणि पथ्यपाणी यांची काळजी घ्या. मनातून क्रोध आणि नकारात्मक भावना काढा. व्यवसाय कार्यस्थळावर भागीदारांमध्ये मतभेद होणार नाहीत याची खबरदारी घ्या. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामात तुम्ही तुमची क्षमता योग्य प्रकारे वापरल्यास विलंबाने का होईना, पण कार्यसिद्धी.

See also  अनेक सुवर्ण संधी मिळणार या 4 राशीला, भगवान श्रीशिवशंकर देणार प्रभावी शक्ती, होणार धन लाभ...

कुंभ:
आज तुम्ही दृढ मनोधैर्य आणि आत्मविश्वासाने प्रत्येक कार्य कराल. कुटुंबीय व मित्रमंडळी यांच्या समवेत प्रवास किंवा पर्यटनाची शक्यता जास्त आहे. दिवस मनोरंजक व संस्मरणीय ठरेल. नोकरी, व्यापार, व्यवसायात, भागीदारीत फायदा होईल. वस्त्रालंकार, स्वरुची भोजन इ. सह वाहनसौख्य मिळेल.

मीन:
आजचा आपला दिवस शुभ आहे, असे ग्रह म्हणतात. आज आपल्याकडे अधिक मनोबल आणि आत्मविश्वास असेल. शारीरिकदृष्ट्या तुम्ही निरोगी असाल. कौटुंबिक वातावरण देखील शांत, समाधानी असेल. स्पर्धकांवर विजय प्राप्त होईल. स्वभावातील क्रोध दूर करुन, बोलण्यावर संयम ठेवल्यास लाभयोग आहेत. आज सहकाऱ्यांकडून नोकरी, व्यवसाय कार्यस्थळी चांगले सहकार्य मिळेल. सासरकडून सुवार्ता प्राप्त होतील.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment