श्री गजानन महाराजांची या 7 राशींवर झाली मोठी कृपा, लवकरच मिळणार मोठी खुशखबरी आणि मोठे आर्थिक यश…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

गजानन जे स्वरुप कांही, तें तुक्याविण वेगळे नाही |
दत्त भैरव मार्तड तेही, रुपें तुझीच अधोक्षजा ||
या सर्व स्वरुपांकारण, आदरे मी करी वंदन |
माझे त्रिताप करा हरण | हेंच आहे मागणे ||

शेगावीच्या श्री गजानन महाराजांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ७ भाग्यवान राशी आहेत… वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तूळ, मकर आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

Advertisement

मेष:
आज दिवसभर तुम्हाला बराच त्रास सहन करावा लागणार आहे. तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटेल. विनाकारण खर्चाचे प्रमाण वाढेल. योग्य ठिकाणी भांडवल गुंतवण्याची काळजी घ्या. परोपकार करतांना स्वतःचेच नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना काळजीपूर्वक करावेत. अध्यात्मात अधिक रस असेल. लाभाच्या लोभामध्ये अडकू नका. द्विधा मनस्थितीमुळे निर्णय होणार नाहीत.

वृषभ:
आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे, असं ग्रह म्हणत आहेत. नोकरी, व्यवसाय आणि उत्पन्न वाढीमध्ये लक्ष्मीजी प्रसन्न होतील. आनंद उल्हासाचे वातावरण असेल. कुटुंब आणि मित्रांसह मनोरंजन होईल. नवीन संपर्क आणि परिचय व्यवसाय क्षेत्रात फायदेशीर ठरेल. थोडा प्रवास, मुक्काम आनंददायक असेल. आज संपूर्ण दिवस आनंद आणि मनोरंजनाने भरला जाईल.

See also  श्रीशिवशंकराच्या कृपेने नोकरी, व्यापार-व्यवसायात यशस्वी होणार या 7 भाग्यवान राशी, जीवनाला मिळणार योग्य दिशा…
Advertisement

मिथुन:
आज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दिवसभर आनंद राहील. नोकरी, व्यापार, व्यवसाय क्षेत्रातील कामाचे कौतुक केल्यानेही कामाबद्दल उत्साह वाढेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रातही सन्मान प्राप्त होईल. आपण कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्रातील कामेही सुरळीत पार पडतील.

कर्क:
आजचा भाग्यवृद्धीचा दिवस आहे, असं ग्रह म्हणत आहेत. परदेशातून किंवा दूरच्या देशांतून चांगली बातमी मिळेल. अल्प मुक्काम किंवा कोणत्याही धार्मिक भेटीमुळे मनातील आनंद वाढेल. आजचा दिवस शारीरिकदृष्ट्याही निरोगी असेल. आज तुम्हाला मानसिकरित्याही आनंद होईल. मित्र आणि कुटुंबासमवेत मजेत दिवस घालवाल. व्यवसाय क्षेत्रातही फायदा होईल. अचानक धनलाभाचे मजबूत योग आहेत. परदेशात जाण्याच्या प्रयत्नात आणि धार्मिक कार्यात यश मिळेल.

Advertisement

सिंहः
आज आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. आरोग्यावर पैसा खर्च होऊ शकतो. आज तुम्ही घरगुती आहार घेतलात तर त्याचा फायदा होईल. वैचारिक स्तरावर नकारात्मकतेचा पगडा राहील. त्यावर मात करण्याचा ग्रहांचा सल्ला आहे. ध्यान आणि अध्यात्मात रुची वाढेल. इष्टदेवतेचे नामस्मरण आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाईल. ज्यामुळे मानसिक चिंता, आजार मोठ्या प्रमाणात कमी होतील.

कन्या:
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. प्रसिद्धी मिळविणे सोपे होईल. नोकरी, व्यापार आणि व्यवसायाच्या क्षेत्रात तसेच भागीदारांशी असलेल्या संबंधात सकारात्मकता वाढेल. नवीन वस्त्रलांकरांच्या खरेदीने मन प्रसन्न होईल. मित्रांसह प्रवास, पर्यटनचा आनंद घेण्यास सक्षम असाल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील.

See also  शनी देवाच्या कृपेमुळे या 5 राशीचे भाग्य बलवान झाले, कुबेराचे धन देऊन जाणार, दुः’ख करणार दूर…
Advertisement

तुळ:
आज तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील, असे ग्रह म्हणत आहेत. व्यवसाय क्षेत्रात नफा होईल. सहकाऱ्यांचेही उत्तम सहकार्य मिळेल. आपण कुटुंबासमवेत समाधानाने वेळ घालवू शकाल. बोलण्यावर संयम ठेवण्याचा व आवश्यक ठिकाणीच खर्च करण्याचा सल्ला ग्रह देत आहेत. सर्व कामात यश आणि प्रसिद्धी देखील मिळेल.

वृश्चिक:
आज ग्रह तुम्हाला वादविवादात अडकू नका असा सल्ला देत आहेत. संततीविषयी चिंता असेल. अभ्यासामध्ये यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. कुठेही भांडवल गुंतवणूक न करण्याचा सल्ला ग्रह देत आहेत. प्रवास पुढे ढकला किंवा शक्य असल्यास टाळा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. परिश्रमानुसार यश मिळेल.

Advertisement

धनु:
मानसिकदृष्ट्या आज तुमच्यात उत्साह कमी राहील, यामुळे मनामध्ये चलबिचल निर्माण होईल. कौटुंबिक वातावरण दोलायमान होईल, कारण कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असू शकतात. स्थावर मालमत्तेचे दस्तऐवजीकरण करताना विशेष काळजी घ्या. धनहानी आणि बदनामी होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. आईच्या आरोग्याबाबत चिंता असेल. तुम्हाला छातीत वेदना जाणवू शकते.

मकर:
आजचा दिवस मित्र आणि कुटूंबासह आनंदात व्यतीत होईल. कोणत्याही रमणीय स्थळावर सहल, प्रवास, पर्यटन देखील केले जाऊ शकते. आज आपण स्थावर मालमत्तेशी संबंधित कार्य करण्यास सक्षम असाल. व्यावसायिक लोकांसाठी वेळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी वेळ सुसंगत असेल. स्पर्धकांचा पराभव होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आज आर्थिक फायद्याचे योग आहेत. तुम्ही आज नवीन कामे सुरू करण्यात सक्षम असाल.

See also  शेगावीचे संत श्री गजानन महाराजांच्या कृपेने यशस्वी होणार या ७ भाग्यवान राशी, जाणून घ्या आजचे राशीभविष्य...
Advertisement

कुंभ:
मानसिकदृष्ट्या द्विधा मनस्थितीचा अनुभव आल्याने काही निर्णय घेण्यास त्रास होईल. अनावश्यक खर्च टाळा बोलण्यावर संयम न ठेवल्यामुळे कुटूंबियांमध्ये कलह होण्याची शक्यता आहे. अभ्यासामध्ये मनाच्या एकाग्रतेवर विद्यार्थ्यांना अधिक भर द्यावा लागेल. केलेल्या कामाचे यश मिळविण्यात विलंब होऊ शकतो.

मीन:
आजचा आपला दिवस शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आनंदाने भरलेला असेल. नोकरी, व्यापार व उद्योगात उत्साही वातावरण असल्यामुळे नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कौटुंबिक वातावरणात शांतता व समाधान राहील. मित्र आणि कुटूंबासह प्रवास, मुक्काम करू शकता. अचानक धनलाभाचे तसेच धार्मिक यात्रा किंवा धार्मिक कार्य करण्यासाठी योग आहेत.

Advertisement

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंका निरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Advertisement

Leave a Comment

close