या 8 राशींना सुख आणि धन प्राप्ती होणार, श्री शनी देव देत आहेत विशेष आशीर्वाद, दुःख देखील हरणार…

जय जय श्री शनिदेव प्रभु, सुनहु विनय महाराज।
करहु कृपा हे रवि तनय, राखहु जन की लाज॥

आज श्री शनी देवांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ८ भाग्यवान राशी आहेत… मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या, तूळ, धनु, आणि मकर. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष : आज ग्रहांचे आशीर्वाद तुमच्यावर असतील. तुम्ही दिवसभर शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल. कौटुंबिक जीवन आनंदी राहून स्वरुची सहभोजनाची शक्यता देखील आहे. आज हरवलेल्या वस्तू सापडण्याची शक्यता आहे. आपले विचार आणि भावना नियंत्रित ठेवल्यास अतिरिक्त लाभ होईल. परदेशी व्यापाराशी संबंधित लोकांना यश आणि नफा मिळेल. वादविवाद टाळून बौद्धिक चर्चेत सुयोग्य ठराव स्वीकारले पाहिजेत असा सल्ला ग्रह देत आहेत.

वृषभ : आज दिवसभर एक उत्साह आणि मानसिक आनंद राहील. आपण आपल्या कामात पद्धतशीरपणे प्रगती करण्यास आणि योजनेनुसार कार्य करण्यास सक्षम असाल. अपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात येतील. कार्यालयात सर्वांचे सहकार्य चांगले राहील. संततीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आपण स्वत:ला मनासारखा वेळ देऊन मानसिक आनंद घेऊ शकाल. आज आपले आरोग्यही चांगले राहील.

मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरेल. नियोजित कामे वेळेत पूर्ण कराल. नोकरी, व्यापारात सर्वांच्या सहकार्याने प्रगती साधाल. कौटुंबिक जीवनात सुवार्ता मिळतील. तब्येतीच्या तक्रारी दूर होऊन आज आरोग्यही सुधारेल. शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहून आनंद घेऊ शकाल.

कर्क : आज सर्वच बाबतीत ग्रह तुम्हाला काळजी घेण्याची सूचना करत आहेत. आज शारीरिक आणि मानसिक दोन्हींचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी, आपल्याला कसरत करावी लागेल. आपल्याला वेदना जाणवतील. छातीत दुखणे किंवा तत्सम इतर तब्येतीच्या तक्रारी असतील. घरात सदस्यांसह तीव्र कलह किंवा वादविवादांमुळे मनामध्येही दुःख असेल. पैशाचा अधिकाधिक खर्च होईल. सामाजिकदृष्ट्या तिरस्करणीय घटना घडणार नाही याची काळजी घ्या. आज निद्रानाश तुम्हाला त्रा’स देईल.

सिंह : आज प्रत्येक कामाचे यश आणि प्रतिस्पर्ध्यांवरील विजयामुळे तुमच्या मनात आत्मविश्वास आणि आनंद राहील असे ग्रह म्हणतात. भाऊ-बहिणींशी असलेले नातेही मधुर व दृढ राहील. आपण मित्र आणि प्रियजनांबरोबर रम्य पर्यटनस्थळांच्या प्रवास, सहलीचा आनंद घेण्यास सक्षम असाल. आज तुमचे आरोग्यही चांगले राहील. तुमचा आर्थिक फायदाही होईल. मानसिकदृष्ट्या निरोगी रहाल. भाग्यवृद्धीची चिन्हे आहेत. आज नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे.

कन्या : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस आहे, असे ग्रह म्हणतात. वाणीच्या गोडपणामुळे आपण इतर लोकांच्या मनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकाल. कौटुंबिक वातावरणही चांगले राहील. तरीही, तुम्ही बोलण्यावर संयम ठेवल्याने इतरांशी वादविवादाची शक्यता कमी होईल. आर्थिक कामेही आज विनासायास होतील. आपण नकारात्मक विचारांपासून दूर रहाल. मित्र आणि प्रियजनांना भेटाल. जवळचा प्रवास होऊ शकेल.

तुळ : तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला ग्रहांचा आशीर्वाद असेल. आर्थिक योजनाही सहज साध्य केल्या जातील. आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आनंदाचा अनुभव घ्याल. नवीन वस्त्रालंकार खरेदी आणि मनोरंजनासाठी पैसा खर्च होईल. वैचारिकदृष्ट्या मजबूत राहाल. तुमचे सर्जनशील मन उत्साहाने कार्यरत राहील.

वृश्चिक : ग्रह म्हणतात की आजचा दिवस मनोरंजन-छंद आणि करमणुकीच्या गोष्टींत व्यतीत होईल. आरोग्याबाबतच्या तक्रारी असतील. मनात चिंतेची भावना असेल. अपघात योग आहेत, काळजी घ्या. मित्रमंडळी व नातेवाईकांमध्ये गैरसमज किंवा मतभे’द होण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीशी संबंधित कामात सा’व’ध’गिरी बाळगा. प्रत्येक ठिकणी संयमित वर्तन ठेवल्यास अ’न’र्थ टाळला जाईल.

धनु : आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळण्याबरोबरच कौटुंबिक जीवनात तुम्हाला आनंद आणि समाधानाची भावना देखील मिळेल. ग्रहांच्या कृपेने उत्पन्न आणि व्यवसायात नफा वाढेल. प्रियजनांसह सुखद क्षण घालवाल. मित्रांसह रमणीय ठिकाणी पर्यटन, प्रवास आयोजित केले जातील. अविवाहितांसाठी विवाहयोग जुळले जातील. पत्नी व मुलाकडून नफा मिळण्याची शक्यता आहे.

मकर : व्यवसायाच्या क्षेत्रात पैसा, मूल्य आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायाच्या वृद्धी साठी व वसुलीसाठी केलेल्या प्रवासातून फायदा होण्याची शक्यता आहे. कामावर उच्च अधिकारी आनंदित होतील. त्यामुळे पदोन्नतीही मिळू शकेल. सरकार, मित्र आणि नातेवाईक यांचेकडून फायदे मिळतील. कौटुंबिक जीवनात तुम्ही आनंदाचा अनुभव घ्याल. मुलांची प्रगती आपल्याला समाधानाची भावना देईल.

कुंभ : ग्रह म्हणतात की आज आपण शारीरिकदृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या कमजोर रहाल. आज काम करण्याचा उत्साह कमी असेल. आज नोकरीत उच्च अधिकाऱ्यांसह वागता-बोलतांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चैन आणि मौजमस्तीसाठी निष्कारण जास्त पैसा खर्च होईल. मुलांविषयी चिंता सतावेल. प्रतिस्पर्ध्यांशी चर्चा वा वितंडवाद करू नका. आपणास परदेशातून एखादी बातमी मिळेल.

मीन : आज आपल्याला आकस्मिक धनलाभ होईल. आज मानसिक आणि शारीरिक श्रमांमुळे आरोग्य बिघडू शकते. सर्दी, श्वास लागणे, खोकला आणि पोटदुखीचा त्रास होईल. आज खर्च वाढेल. जलाशयापासून दूर राहण्यातच सुरक्षितता आहे. वारसाहक्काने लाभ होईल. अनैतिक भावना व तशा लैंगिक संबंधांवर अंकुश ठेवा. ईश्वरी भक्ती आणि आध्यात्मिक विचारांमुळे तुमचे मानसिक दु:ख कमी होण्यास मदत मिळेल.

शुभम भवतु:!

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment