या 6 राशींचे तारे चमकणार, भगवान श्रीशिवशंकरांच्या कृपेने मोठा धन लाभ मिळण्याचा योग बनत आहे…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

शिवाय गौरी वदनाब्जवृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय।
श्री नीलकंठाय वृषभद्धजाय तस्मै शि काराय नम: शिवाय:॥

आज भगवान श्री भोलेनाथांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ६ भाग्यवान राशी आहेत… वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर आणि कुंभ. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष : ग्रह म्हणतात की आजचा दिवस तुम्हाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून वेगळी अनुभूती देणारा असेल. आपल्याकडे गूढविद्या, रहस्य यांच्याशी संबंधित गोष्टींचे विशेष आकर्षण असेल. आज आध्यात्मिक सिद्धी मिळण्याचीही शक्यता आहे. क्रोध, वाणी आणि द्वेषाच्या भावनांवर संयम ठेवा. नवीन काम सुरू करू नका आणि शक्य असल्यास प्रवास पुढे ढकला.

Advertisement

वृषभ : ग्रहाच्या आशीर्वादाने आज तुम्हाला कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. परिवारजन आणि जवळचे प्रिय मित्र यांच्यासह आनंदी वातावरणात एकत्र येऊन सहभोजनाचा कार्यक्रम कराल. तसेच एखाद्या छोटेखानी प्रवास वा सहलीचे आयोजन कराल. परदेशात असलेल्या नातेवाईकांच्या बातमीने मन आनंदित होईल. आज अचानक धनलाभाचे योग बनले आहेत.

मिथुन : ग्रह म्हणतात की आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. घरात शांतता व आनंदाचे वातावरण असेल. आपले अपूर्ण काम होईल, तुम्हाला यश आणि कीर्ती मिळेल. आर्थिक लाभही मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढू शकते परंतु खर्च व्यर्थ ठरणार नाही. शारीरिक आरोग्य उत्तम असेल. राग आणि बोलण्यावर संयम ठेवल्यास तुम्हाला लाभच होईल.

See also  शनिदेवाच्या कृपेने कष्टांचे होणार सोने, या 7 भाग्यवान राशींना मिळणार मेहनतीचे फळ… लवकरच होणार धनवान…
Advertisement

कर्क : ग्रह आजचा दिवस शांततेत घालविण्याचा सल्ला देत आहेत. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहणार नाही. शारीरिकदृष्ट्या पोटदुखी होईल आणि मनाला भावनिक चिंता सतावेल. अतिरिक्त प्रासंगिक खर्च होईल. वादविवाद टाळा. प्रवास टाळा. आज नवीन काम सुरू करु नका.

सिंह : आज तुम्ही शारीरिकरित्या अस्वस्थ रहाल. स्नायू आणि पोटाच्या तक्रारी असतील असं ग्रह म्हणतात. घरात नातेवाईकांशी वाद होऊन गैरसमज झाल्याने मन उदास होऊ शकते. आईबरोबर कुरबुर होईल. मानसिक चिंता असेल. शासकीय तसेच मालमत्तेशी संबंधित महत्वाची पत्रे तयार, दुरुस्त किंवा मुद्रांकित करतेवेळी अत्यंत काळजी घ्या अन्यथा नंतर उद्धभवलेले प्रश्न त्रासदायक ठरतील.

Advertisement

कन्या : आज यशस्वी होण्यासाठी कोणत्याही कार्यात विचारपूर्वक पुढे जाण्याचा सल्ला ग्रह आपणांस देत आहेत. भावंडांशी असलेले नातेसंबंध दृढ होतील. मित्रमंडळी आणि नातेवाईकांशी भेट होईल. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे यांतही आर्थिक फायद्याचीच शक्यता जास्त आहे. तुम्हाला समाजात मानसन्मान,आदर मिळेल.

See also  साक्षात माता दुर्गा प्रसन्न आहे या ७ राशींवर, धन संपत्ती, सुख समाधान वाढून मिळेल आर्थिक संकटांतून मुक्ती...

तुळ : ग्रह म्हणतात की आज तुमचे मनोबल दुर्बल राहील. त्यामुळे निर्णय घेणे कठीण होऊ शकते. आज नवीन कामे आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांशी वाद घालू नये, म्हणून आपल्या जिभेवर संयम ठेवा. हट्टीपणा सोडून सामंजस्याची वृत्ती अवलंबण्याचा सल्ला ग्रह देत आहेत. शारीरिक आरोग्य उत्तम राहील.

Advertisement

वृश्चिक : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांसह आनंदाने वेळ घालवाल. मित्रांशी भेट होऊन त्यातून लाभही मिळू शकतो. शुभवार्ता मिळतील. छोटा प्रवास घडून तो लाभदायक ठरेल.

धनु : आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण जाऊ शकतो असे ग्रहसंकेत मिळत आहेत. कुटुंबातील सदस्यांसह वादविवाद होऊन त्याचा त्रास होऊ शकतो. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. मनातील रागाच्या विचारांना नियंत्रित करावे लागेल. अचानक पैसे खर्च करावे लागतील. शारीरिक आरोग्य बिघडू शकते.

Advertisement

मकर : आपण आपला दिवस मित्रमंडळी आणि नातेवाईकांसह घालवाल. आजचा दिवस आपल्यासाठी सामाजिक क्षेत्र, व्यवसाय, नोकरी आणि इतर सर्वच क्षेत्रात फायदेशीर ठरेल. जीवनसाथीच्या शोधात असलेल्यांचे विवाहयोग जुळतील. प्रवास, पर्यटनाचा योग बनत आहे. कुटुंबात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता ग्रहमान वर्तवत आहे.

See also  श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ह्या 7 राशींच्या लोकांचे आता येणार आनंदाचे दिवस, होईल मोठी इच्छा पूर्ण...

कुंभ : ग्रह म्हणतात की आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज तुमचे प्रत्येक कार्य सहजपणे यशस्वी होईल. परिणामस्वरुप तुम्ही मानसिक आनंदात असाल. नोकरीतील उच्च अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे पदोन्नतीचे योग बनतील. वडीलधाऱ्यांचा आशीर्वादही तुमच्या बरोबर आहे. पैशाची आवक वाढेल. कौटुंबिक जीवनात तुम्हाला आनंद मिळेल.

Advertisement

मीन : मानसिक दोलायमान अवस्थवमुळे आपण आज चिंताग्रस्त व्हाल असे ग्रह म्हणतात. शारीरिक थकवा, आळस जाणवेल . उच्च अधिकाऱ्यांसोबत काळजीपूर्वक कार्य आणि आचरण करा. आज आपण संतती विषयी चिंता कराल. आवश्यक निर्णय घेणे टाळणेच योग्य. व्यापारी वर्गाला व्यापारात अडथळा येऊ शकेल. आज नकारात्मकतेला थारा देऊ नका.

शुभं भवतु: !

Advertisement

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment

close